अकोला येथील तरुण तडफदार युवा रुग्णसेवक आयुष्यमान शेरू प्रकाश इंगळे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित रुग्ण कल्याण समिती अकोला जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
आज दिनांक फेब्रुवारी 2023 रोजी अकोला येथील विश्राम भवन (सर्किट हाऊस ) येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागसेन क्षीरसागर व जिल्हा उपाध्यक्ष अनिल इंगळे यांच्या शिफारशी वरून सदर नियुक्त करण्यात आली असून यावेळी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या हस्ते नवनियुक्त रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष रुग्णसेवा शेरू इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पक्षाची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले नवनियुक्त जिल्हा संघटक परशराम देवकर जिल्हा नेते आबा शिरसाठ नागसेन शिरसागर अनिल गवई यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments