Header Ads Widget

Responsive Image

19 फेब्रुवारी ला आयएमएची वॉकेथॉनचे आयोजन सह विविध स्पर्धाचे आयोजन

वॉकेथॉन सह विविध स्पर्धा चे आयोजन....
आयएमएची 15 वर्षांची परंपरा कायम

आयएमएची वॉकेथॉन दि.१९ फेब्रुवारी रोजी अकोला-गत १५ वर्षांपासून आय‌एम‌ए अकोला शाखा वॉकेथॉनचे यशस्वीपणे आयोजन करीत असून यावर्षी ही स्पर्धा स्व. निकुंज अनुप कोठारी यांच्या स्मृति प्रित्यर्थ रविवार दि १९ फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयएमएच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.आयएमए सभागृहात संपन्न या पत्रकार परिषदेत यावेळी आयएमए अध्यक्ष डॉ अनुप कोठारी, प्रकल्प प्रमुख डॉ राजेंद्र सोनोने,सचिव डॉ भुपेश पराडकर,डॉ तेजस वाघेला आदी उपस्थित होते.या वर्षी प्रमुख अतिथी म्हणून कुस्तीपट कृपाशंकर पटेल उपस्थित राहणार आहेत.यंदाची थिम आहे.
"वाहतुकीच्या नियमांचा सन्मान".ही असून सोबत इतर
विशेष स्पर्धांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे. त्यात जनजागृतीसाठी या थीमला तसेच खेलो इंडिया ह्या भारत सरकारच्या योजने ला अनुसरून स्लोगन, घोषणा, ब्रिद वाक्य,फोटोग्राफ, होर्डिंग्ज, बॅनर, देखावे किंवा आणखी काही वेगळ्या पद्धतीने प्रदर्शन करून आपण जनतेला संदेश द्यायचा आहे.
सोबतच वैयक्तिक वेशभूषे साठी "ये मेरा स्वॅग है" आणि गृप च्या वेश भूषेसाठी "बिनधास्त बंदे" अश्या आकर्षक स्पर्धांचे आयोजन असुन त्यासाठी प्रत्येक स्पर्धेत तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत. जेष्ठ नागरिकांसाठी डॉ. एस. यु. गावंडे स्मृती पुरस्कार व दिव्यांगांसाठीचा विशेष पुरस्कार राहणार आहे.
या स्पर्धांमध्ये भाग विशेष नोंदणी कृत स्पर्धकच घेऊ शकतील.
या स्पर्धकांचे परीक्षण वसंत देसाई स्टेडियम मध्ये स्पर्धेच्या दिवशी सकाळी ८ ते ८:३० दरम्यान करण्यात येईल.या स्पर्धेत आणि वॉकेथॉन मध्ये कुणीही निरोगी स्री,पुरूष,मुले, मुली आपल्या जबाबदारी वर सहभागी होऊ शकतात. मात्र अनियंत्रित रक्तदाब असलेले,हृदयविकाराचा आजार असलेले,गरोदर स्त्रिया व डॉक्टरांनी आपल्याला परवानगी दिली नसेल त्यांनी यात सहभागी होऊ नये.
ही वॉकेथॉन १० किमी,५ किमी ३ किमी आणि दिव्यांगांसाठी १.५ किमी अश्या वेगवेगळ्या अंतरासाठी आयोजित केली आहे.

यात किती अंतर धावायचे हे आपल्या कुवतीनुसार ठरविणे अपेक्षित आहे.वसंत देसाई स्टेडियम येथून या सर्व अंतरांच्या वॉकेथॉनना प्रारंभ होईल.यात सहभाग घेण्या साठी दोन प्रकारच्या नोंदणी आहेत.
एक मोफत सहभाग नोंदविता येईल ज्यात आपल्याला सामान्य धावक क्रमांक मिळेल दुसरी विशेष नोंदणी ज्यात अगदी नाममात्र नोंदणी फी घेऊन नोंदणी केल्यास वॉकेथॉन पुर्ण केल्याची विशेष स्मृती म्हणून ह्या कार्यक्रमाचे विशिष्ठ फिनीशर मेडल मिळेल. ह्या नोंदणीची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजे पर्यंत आहे.मोफत नोंदणी १७ फेब्रुवारी पर्यंत करता येईल.
नोंदणी आय एम ए हॉल सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाजूला कार्यालयीन वेळात सुरू आहे.
धावक क्रमांक अथवा रनिंग बिब आय एम ए हॉल येथे दि १६, १७ आणि १८ फेब्रुवारीला वितरीत केले जातील.
वॉकेथॉनच्या सहभागासाठी रविवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता सर्व धावकां नी वसंत देसाई स्टेडियम मध्ये हजर असावे.
या दरम्यान धावकांसाठी ठिकठिकाणी पेयजल आणि
आकस्मिक वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले.हा उपक्रम सफल करण्यासाठी आय एम ए अध्यक्ष डॉ. अनुप कोठारी व प्रकल्प प्रमुख डॉ.राजेंद्र सोनोने प्रकल्प सचिव डॉ.किशोर पाचकोर,आय एम ए सचिव डॉ. तेजस वाघेला आणि डॉ. भुपेश पारडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सतिषचंद्र भट, क्रिडाभारतीचे जिल्हा प्रमुख डॉ.पराग टापरे, प्राध्यापक मोटेगावकर कोचिंग क्लासेस तर्फे प्रल्हाद कबिर, स्टेट बॅंक ऑफ इंडिया रिजनल मॅनेजर सौ. जोशी,ओझोन हॉस्पिटल चे संचालक डॉ.विनीत हिंगण कर,टि. डब्लु. सी.जिमचे संचालक डॉ. आशुतोष डाबरे, फॅशन हबचे संचालक कृष्णा साव, हुशे बंधु ज्वेलर्सचे प्रा. संतोष हुशे, संचालक, आणि अजिंक्य फिटनेस पार्कचे संचालक धनंजय भगत प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

0 Comments