Header Ads Widget

Responsive Image

सूर्योदय बालगृहातील ९व्या मानस कन्येचा प्रतिष्ठित मान्यवरांचा उपस्थितीत होणार विवाह संपन्न..

एक विवाह ऐसा भी.. अकोल्यात होणार खास...
अद्यापही शासकीय अनुदाना पासून वंचित शासनाने भरीव अनुदान प्रदान करावे...

अकोला: मुकेश भावसार / आशिष पाईकराव
समाजातील विशेष अनाथ दूर्लक्षीत बालकांसाठी सामाजिक कार्य करून त्यांच्या जिवनात सूर्यप्रकाश निर्माण करणाऱ्या महानगरातील सूर्योदय बालगृह संस्थेने एक उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम केवळ शैक्षणिक, सामाजिक आणि विशिष्ट वयापर्यंत सांभाळण्याचा नसून रोगग्रस्त जिवन जगत असलेल्या बालकांसाठी भरिव असे काम संस्था गेल्या कित्येक वर्षापासून करीत आहे. संस्थेतील एका अनाथ मुलीच्या बहिणीचे शुभमंगल करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सूर्योदय बालगृहाच्या वतीने सेन्ट्रल प्लाझा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. सूर्योदय परिवाराची सुकन्या कु. हर्षा चंद्रकांत भाबळ अर्थात प.सदगुरु श्री.भैय्युजी महाराज यांची मानस पुत्रीचा शुभविवाह अकोल्याचे स्व. धिरज व्हि.भंभा यांचे चिरंजीव रिकीन भंभा यांचेशी बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12-30  वाजता सूर्योदय बालगृह स्व. चिमणलालजी भरतीया स्मृती भवन महर्षि वाल्मिकी नर्सिंग कॉलेज जवळ, बसेरा कॉलनी, मलकापुर अकोला,येथे वेगळ्याच भावनिक वातावरणात आयोजित करण्यात आले आहे.
ज्या व्यक्तींसाठी समाजाचे हात पुढे येत नाही त्यांच्यासाठी वेळ आणि लोकांचे सहकार्य घेत कार्य करण्याचा वसा सूर्योदय परिवाराने उचलला आहे. प.पु.भय्युजी महाराजांच्या प्रेरणेतून सूर्योदय बालगृह या संस्थेची स्थापना गेल्या १० वर्षा आधी करण्यात आली होती. तेव्हा लावलेले हे रोपटे जणु आता सामाजिक योग दानातून वटवृक्ष होत आहे. यासाठी परिवाराचे जेष्ठ गुरुबंधु पंकज बाबुराव देशमुख तसेच सूर्योदय परिवाराचे सहकारी अगदी घरच्या लग्ना सारखे सातत्याने धावपळ करीत आहेत.
वरील सोहळ्यात अकोल्यातील नव्हे तर इतर ठिकाणचे मान्यवर लोकं, सामाजिक संस्था, संघटना सहभागी होत आहेत. सूर्योदय बालगृहाच्या वतीने आतापर्यंत बालगृहातील अशा आठ मुलींचा विवाह करण्यात आला असून समाजात अशा विशेष बालकां च्या पुनर्वसनासाठी कार्य करणारी ही संस्था अद्यापही शासकीय अनुदाना पासून वंचित असून संपूर्ण विदर्भात अशा प्रकारच्या रोगग्रस्त बालिकाच्या उत्थाना साठी कार्यरत असणाऱ्या या संस्थेला शासनाने भरीव अनुदान प्रदान करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या पत्रकार परिषदेत यावेळी सूर्योदय बालगृहाच्या अध्यक्ष सौ. प्रतिभाताई देशमुख,संचालक प्रशांत देशमुख, पंकज देशमुख, बालगृहाचे समन्वयक शिवराज खंडाळकर पाटील,नवरदेव रिकीन भंबा,सागर खंडेलवाल,निलेश खंडेलवाल,सुरज शुक्ला,गोविंद शर्मा, आनंद पालीवाल,जितेश अग्रवाल,यश सावल आदी मित्रपरिवार उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments