Header Ads Widget

Responsive Image

महिला व बालविकास अधिकारी यांचीं कारवाई..... वाडेगावात रोखला बालविवाह.....

वाडेगावात रोखला बालविवाह......

महिला व बालविकास अधिकारी यांचीं कारवाई.....

अकोला :- ( जिमाका )
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे होणाऱ्या बालविवाहचीं जिल्हा बालसंरक्षण कक्षाला माहिती मिळाली की, वाडेगाव येथे पातुर येथील एका अल्पवयीन मुलीचा बाल विवाह रविवारी(दि.११) होत आहे .
या विवाहस्थळी एक तास आधीच बालसंरक्षण कक्षाचे अधिकारी तेथे पोहोचले. बालिका १८ वर्षांपेक्षा कमी वयाची खात्री करुन तिच्या नातेवाईकां ना बालविवाह अधिनियम २००६ अंतर्गत होणाऱ्या कारवाई बाबत माहिती देण्यात आली.
त्यानंतर मुलीचा विवाह ती १८ वर्षांची पूर्ण झाल्याशिवाय करणार नाही असे लेखी हमी पत्र पालकांकडून घेण्यात आले व विवाह रोखण्यात आला. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, संरक्षण अधिकारी सुनिल सरकटे, क्षेत्रीय कार्यकर्ता योगेंद्र खंडारे वाडेगाव पोलीस चौकीचे हेडकॉन्स्टेब ल विनायक पवार, गणेश गावंडे हे या पथकात होते. या कारवाईत वाडेगाव सरपंच सुनिल घाटोळ, बाळापूर पोलीस स्टेशनचे दत्तात्रय अवाळे यांचे सहकार्य मिळाले. या कारवाईसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments