Header Ads Widget

Responsive Image

जुन्या पारधी वाड्यातील तरुणांस तलवार घेऊन फिरतांना अटक

जुन्या पारधी वाड्यातील तरुणांस तलवार घेऊन फिरतांना अटक 

अमळनेर :- विकी भावसार

हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या शहरातील जुना पारधीवाडा भागात राहणाऱ्या आरोपीला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर शहरातील जुना पारधीवाडा भागात राहणारा राजू उर्फ दादू एकनाथ निकुंभ हा शहरातील सुभाष चौक भागांमध्ये धारदार तलवार घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली.त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिलदेव पाटील, पोलीस नाईक मिलिंद भामरे, लक्ष्मीकांत शिंपी, सूर्यकांत साळुंखे यांनी ७ डिसेंबर रोजी दुपारी कार्यवाही करत आरोपी राजेश उर्फ दादू एकनाथ निकम याला पटेल कॉम्प्लेक्स जवळी ल गल्लीतून ताब्यात घेतले आहे.
त्याच्या जवळील तलवार हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात आरोपी राजेश उर्फ दादू एकनाथ निकम याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार
रामकृष्ण कुमावत करीत आहे.

Post a Comment

0 Comments