शहरात अवैध धंदे जोरात,नागरिक कोमात...
अकोला :- शुक्रवार (दि. १६) शहरात दोन अल्पवयीन 14 व 16 वर्षीय मुलींवर न्यु तापडिया नगर भागात गँगरेप करण्याची धक्कादायक घटना सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनं च्या हद्दीत घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दोन अल्पवयीन मुली त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून घरी परत येत असतांना त्यांना एक ओळखीचा युवक भेटला. घरी सोडतो असे म्हणून त्याने दोघींनाही गाडीवर बसवून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील एका अनोळखी ठिकाणी नेले. दरम्यान, त्याने मुलींना कोल्ड्रींक्स पिण्यास दिले. यामध्ये त्याने मादक पदार्थ मिसळले होते. कोल्ड्रींक्स पिल्यानंतर पीडित मुलींना गुंगी यायला लागली. याच दरम्यान आरोपी व त्याच्या अन्य मित्रांनी अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार केले.
अकोल्याचे पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तातडीने घटनास्थळी भेट दिली. सिव्हील लाईन पोलिसांना याबातच्या चौकशीचे निर्देश दिले.
पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे. उपविभागीय अधिकारी सुभाष दुधगावकर हे स्वत: सकाळ पासून सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात हजर होते.
0 Comments