Header Ads Widget

Responsive Image

बसच्या धडकेत दोन्ही डॉक्टर जागीच ठार

बसच्या धडकेत दोन्ही डॉक्टर जागीच ठार 

मळनेर  :- आझाद नायक न्युज, विकी भावसार 

 शिरपूरकडून येणाऱ्या बसने दुसऱ्या बसला ओव्हर टेक केल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली.
यात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पांझरा नदी पुलाजवळ घडली. महेंद्र शांतीलाल बोरसे (३९, रा.पाडसे ता. अमळनेर) व अरुण उर्फ शंकर नथ्थू साळुंखे,३८, रा.हिंगोणे खुर्द प्र.जळोद,ता.अमळनेर अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही वैद्यकीय व्यवसाय करीत होते, अशी माहिती मिळाली.

शुक्रवारी दुपारी शिरपूर -अमळनेर ही बस पांझरा नदी पूल ओलांडून अमळनेर हद्दीत आली होती. त्याचवेळी एका हॉटेलजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसली. यात दुचाकीवरील महेंद्र बोरसे व अरुण साळुंखे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.
महेंद्र हा अमळनेर येथे भाड्याने राहत होता. मोंढाळे,बहादरपूर (ता.पारोळा) येथे त्याचा दवाखाना होता. त्याच्या पश्चात आई,वडील,भाऊ,पत्नी व मुलगा असा परिवार आहे. अरुण हा बांभोरी (ता. धरणगाव) येथे वैद्यकीय व्यवसाय करीत होता. त्याच्या पश्चात वडील,भाऊ ,पत्नी,दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.

बसचालकाविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments