अमळनेरचे सुपुत्र तथा भारतीय नौदलातील (नेव्ही) जवान शुभम बाळू बिऱ्हाडे (26) हे कर्तव्यावर असतांना आज दि.23 रोजी सकाळी मुंबई - कुलाबा येथील मुख्यालयातील कवायत मैदानावर कवायत करत असतांना हृदय विकाराचा झटका आल्याने शुभम बिऱ्हाडे यांचे दुःखद निधन झाले.
गेल्या सहा वर्षापूर्वी शुभम बिऱ्हाडे हे नेव्ही मध्ये दाखल झाले होते. त्यांना गीत गायन, वाद्याची आवड होती. त्यांच्या निधनाची बातमी कळताच शहरात सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. शुभम बिऱ्हाडे यांच्यावर रविवार दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पाश्च्यात पत्नी, आई, वडील, बहीण असा परिवार असून यावेळी त्यांचा नातेवाईकांचा आक्रोश मनाला हेलावाणारा होता.
खान्देश रक्षक फाउंडेशन तर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
0 Comments