अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेतर्फे व अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या अनमोल सहकार्याने अमळनेर शहरात महारक्तदान शिबिर संपन्न..
अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेतर्फे व अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या अनमोल सहकार्याने अमळनेर शहरात महा रक्तदान शिबिराचे आयोजन १७ सप्टेंबर शनिवार रोजी आयोजित करण्यात आले होते .
विशेष म्हणजे शहरातील सात ठिकाणी शिबीर घेण्यात आले होते .
रोटरी क्लब ऑफ अमळनेर, लायन्स क्लब ऑफ अमळनेर,
जैन सोशल ग्रुप, सकल जैन समाज नवयुवक मंडळ, प्रफुल्ल कॉमर्स क्लासेस, HDFC बँक अमळनेर, श्री स्वामीनारायण मंदिर संस्था, राष्ट्रीय सेवा केंद्र, मुंदडा फाउंडेशन, खानदेश शिक्षण मंडळ व धनदाई महाविद्यालय आणि इतर सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने हे मेगा ब्लड डोनेशन ड्राइव तथा महा रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यात माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी देखील स्वयंफूर्तीने रक्तदान करून युवकांना रक्तदान विषयी जागृत केले.व यास उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाने व नगरपरिषद यांनी देखील या महाशिबिरास सहकार्य केलेले आहे.
व जवळपास 500 च्या जवळपास रक्तबॅग संकलित करण्यात आले.
या शिबीरात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने देखील रक्त संकलनात मोलाचे सहकार्य लाभले
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे अध्यक्ष चेतन राजपुत, जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले, संजय पाटील, किरण पाटील, महेंद्र रामोशे,उमेश काटे, जयेश काटे, महेंद्र पाटील, उमेश धनराळे, मुन्ना शेख, आर.जे.पाटील, राहूल पाटील जयंत वानखेडे, कमलेश वानखेडे, समाधान मैराळे, जितेंद्र ठाकूर, सुरेश कांबळे, अजय भामरे यासह इतर पत्रकार बांधवांचे अनमोल सहकार्य लाभले.
महारक्तदान शिबिराला अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद आयोजित विश्वातील सर्वात मोठे रक्तदान अभियान निमित्ताने रक्तदान करणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार तसेच या कार्यात मदत करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था, अमलनेर नगरपरिषद, मूंदड़ा फाउंडेशन, पत्रकार असोसिएशन लायंस क्लब, रोटरी क्लब, स्वामीनारायण मंदिर संस्थान, धनदाई माता एजुकेशन ट्रस्ट, राष्ट्रीय सेवा केंद्र, प्रफुल्ल कॉमर्स अकादमी, hdfc बैंक, खान्देश रक्षक दल, जैन सोशल ग्रुप, सकल जैन नवयुवक मंडल या सर्वांचे हार्दिक आभार
विशेष आभार प्रान्त मैडम सीमा अहिरे, मा. आमदार शिरीष दादा चौधरी, पत्रकार चेतन राजपूत, संजय पाटील, गट नेते प्रवीण (बबली) पाठक यांनी स्वतः रक्तदान करुन सर्वांचे मनोबल वाढ़वले, तसेच DYSP राकेश जाधव, संजय चौधरी, मा. आमदार स्मिता वाघ, भैरवी ताई पलांडे, जयश्री पाटील, डॉ अनिल शिंदे, डॉ बी आर बाविस्कर, संतोष लोहरे, शिरिष दादा मित्र परिवार सह ज्ञात व अज्ञात सर्व मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केल्या बद्दल हार्दिक आभार मानले.
0 Comments