Header Ads Widget

Responsive Image

गुटखा प्रकरण '' तेरी भी चुप मेरी भी चुप मुळे '' प्रकरण आले अंगलट जुने शहर ठाणेदार, LCB प्रमुख आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पथक यांच्या सह पोलीस कर्मचारी निलंबित


गुटखा प्रकरण '' तेरी भी चुप मेरी भी चुप मुळे '' प्रकरण आले अंगलट जुने शहर ठाणेदार, LCB प्रमुख आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पथक यांच्या सह पोलीस कर्मचारी निलंबित

अकोला:-अमरावती येथील IGचंद्रकिशोर मीना याच्यां पथकाने अकोल्यात येऊन गुटखा माफि्यांचा गोडाऊन वर कारवाई केल्याने याचा ठपका अकोल्यातील जुने शहर पोलिसां वर ठेवत जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी बिट जमादार सह संपूर्ण डीबी पथकातील कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या विशेष पथकाने तीन दिवसांपूर्वी अकोल्या तील बाळापूर रोड वरील बिझनेस सेंटर येथे रात्रीच्या वेळी एका ट्रकमधून तब्बल ४० लाखाचा गुटखा जप्त केला होता. यावेळी तीन ते चार जण घटनास्थळावरून फरार झाले होते. याप्रकरणी जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान या प्रकरणात जुने शहर डीबी स्कॉडने कसुर केल्यामुळे पथकातील ६ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यासोबतच जुने शहर ठाणेदार LCB प्रमुख आणि जिल्हा पोलिस अधीक्षक पथक यांचाही कसुर अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.

दरम्यान या कारवाईमुळे अकोला पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे.



सर्वांना माहीत असलेला मेन गुन्हेगार मोकटच... आणि कारवाई पोलीस कर्मचारी वर

यापूर्वीही अकोल्याचे पालकमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी वेशांतर करून गुटख्या चा माल पकडला त्याचे स्ट्रिगं ऑपरेशन देखील केले परंतु आठ दिवस बोंबाबोंब झाली प्रकरण शांत होताच परत जैसे थे चालु झाले.

सर्वांना माहित आहे की अकोल्यात गुटखा किंग कोन आहे परंतु त्यांच्यावर कुठलीच कारवाई करायला हिम्मत दाखवत नसल्याने त्यांचे धंदे जोरात फोफावले आहेत.

Post a Comment

0 Comments