जळगांव मधील अयोध्यानगर येथे घराच्या बाथरूममध्ये ४६ वर्षीय अजय उर्फ क्षमेंद्र चा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने निधन
शहरातील अयोध्या नगरातील लिलापार्क अपार्टमेंटमध्ये क्षमेंद्र उर्फ अजय अरुण कुलकर्णी, वय ४६, रा. न्यू प्लॉट अमळनेर,ह.मु.लिलापार्क मनुदेवी मंदिरा समोर,अयोध्यानगर,कुटुंबियांसह राहतात. ते अशोक लेल्यांड कंपनीत सुपरवायजर होते. त्यांच्या सासूबाईंचे निधन झाल्याने त्यांची पत्नी व दोघ मुली चंद्रपूर येथे गेले होते. आज त्या घरी येण्यासाठी निघाल्या होत्या.
दरम्यान अजय यांची बहिण त्यांना फोन करीत होत्या परंतु अजय हे फोन उचलत नसल्याने त्यांनी शेजारच्यांना फोन करुन अजय यांच्याबाबत विचारणा केली.
शेजारच्यांनी त्यांचा दरवाजा बंद असल्याचे सांगितले त्यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर आवाज देऊनही आतून कुठलाच प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा शेजार्यांनी MIDC पोलिसांना घटनेची माहिती दिली.
वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना तपासून मयत घोषीत केल्यानंतर MIDC पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली .
अजय हा मृदू भाषी व सुस्वभावी व शांत होता त्याने आपला मित्र परिवार खुप जमवला होता.त्याने जळगांव अमळनेर खुप वर्ष अप-डाऊन केले व शेवटी अकोला येथे स्थायिक झाला होता.
त्याच्या पश्च्यात आई, बहीण, पत्नी, दोन मुलं, व भाऊ असा बराच आप्तपरिवार आहे.
आझाद नायक न्युज तर्फे अजय यास भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻💐💐💐
0 Comments