येथील बदलापूरच्या सुरज स्केटिंग अकॅडेमीच्या ४१ मुलांनी केला विश्वविक्रम....
सलग ९६ तास स्केटिंग करून ४१ मुलांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोदनवून आपले नाव उज्वल केले.
बेळगाव येथे पार पडलेल्या ९६ तास सलग रोलर स्केटिंग करण्याचा विक्रमामध्ये ४९६ खेळाडूंचा समावेश होता. हा कार्यक्रम २८-मे -२०२२ ते ०३-जून-२०२२ या काळात शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब यांच्या मार्फत घेण्यात आला. त्यात बदलापूरच्या सुरज स्केटिंग अकॅडेमिच्या ४१ मुलांनी आपले नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले व आपल्या अमळनेर सह बदलापूर शहराचे नाव उज्वल केले आहे.
या सर्व मुलांना प्रशिक्षण देणारे शिक्षक सौ. मनीषा कौशिक गरवालीया व सुरज गरवालीया यांनी दिले.
यात आपल्या अमळनेर येथील पानखिडकी भागातील श्री. दत्तात्रय बाबुराव गुरव यांचे नातू ,श्री.बाळू गुरव यांचे पुतणे आणि मिलिंद (नानू) गुरव यांचे चिरंजीव .तनिष मिलिंद गुरव सध्या बदलापूर येथे स्थायिक या साडेपाच वर्षीय चिमुरड्याने अमळनेर शहराचे नाव उंचीवर नेण्याचे काम केले आहे.
अमळनेरच्या सर्व मान्यवरांनी सर्व मुलांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments