अकोला : अकोला शहरातल्या जिल्हा स्त्री रूग्णालयात फोन व वस्तू चोरणारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
अकोला पोलीस या चोराच्या शोधात आहेत. जिल्हा स्त्री रूग्णालयातील नातेवाईकांचे मोबाईल फोन व इतर मौल्यवान वस्तु चोरण्याचा सपाटाच या भामट्याने लावला आहे .
रुग्णालय सरकारी असो की खाजगी, हा चोर नातेवाईकांचे फोन, पाकीट व इतर मौल्यवान वस्तू चोरतो. ही दृश्य जिल्हा रुग्णालयातील cctv त कैद झाली आहेत .
या रुग्णालयात रुग्णांना दाखल केल्यानंतर त्यांच्या सोबत आलेले नातेवाईक बाहेर निवांत झोपतात. रुग्णांच्या मदतीसाठी दिवसभर धावपळ केल्यानंतर रुग्णालय परिसरात नातेवाई कांना गाढ झोप लागते तेव्हा हा भामटा येऊन त्यांच्या महागड्या मोबाईल वर , त्याच्या पैशांच्या पाकिटावर, किमती वस्तुंवर हात साफ करतो.
रुग्णांचे नातेवाईक झोपले असले तरी CCTV ने आपलं काम दाखवले आणि तो अखेर हा भामटा CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे गेल्या काही दिवसांपासून रुग्ण नातेवाईकांचे अनेक मोबाईल, पैशाचं पाकीट व मौल्यवान वस्तु जिल्हा स्त्री रुग्णालयातून चोरीला गेले आहेत .
या चोरट्याने केवळ सरकारी रुग्णालया तच डल्ला मारला नाही तर इतर खाजगी रुग्णालयांमध्येही चोऱ्या केल्याचा संशय आहे . याविषयी एका नातेवाईकाने पोलिस स्टेशनलाही तक्रार दाखल केली आहे .
तर रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल चोरणाऱ्या भुरट्या चोराचा शोध पोलीस घेत आहेत .
पोलिसांशी संपर्क करण्याचे व सावध राहण्याचे आवाहन
याविषयी कोणाला जर या चोराविषयी काही माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
0 Comments