Header Ads Widget

Responsive Image

अनैतिक संबंधातून अमळनेर तालुक्या तील युवकाचा खुन

अनैतिक संबंधातून अमळनेर तालुक्यातील युवकाचा खुन


धुळे तालुक्यातील अंबोडे शिवारत एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळून आला.

मृताचे नाव ज्ञानेश्वर रामभाऊ राठोड,वय २५,रा.रणाईचे तांडा,ता.अमळनेर, जि.जळगाव असे निष्पन्न झाले. मृताच्या पोटावर, पाठीवर,तोंडावर तीक्ष्ण हत्याराचे वार करण्यात आले होते. त्यावरून अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा धुळे पोलिसांनी २४ तासात छडा लावला.

या गुन्ह्याचे तपासात धुळे तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपीचा शोध घेतला. तपासात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपी मृताचा पुतण्या जगदीश बबलु राठोड,रा.रणाईचे तांडा, ता.अंमळेनर,जि.जळगाव,याची सखोल चौकशी करण्यात आली. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

अनैतिक संबंधाच्या कारणावरून आरोपीने पीडित ज्ञानेश्वर राठोड याला रणाईचा तांडा येथून मोटार सायकलवरुन अंबोडे शिवारातील निर्जनस्थळी आणलं.
या ठिकाणी आरोपीने पीडित ज्ञानेश्वर राठोडच्या पोटावर,पाठीवर,मानेवर चाकूने वार करून खून केला असे तपासात निष्पन्न झाले आहे.त्यावरून आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपीला धुळे तालुका पोलिसांनी २४ तासात ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविण कुमार पाटील,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस उप निरीक्षक अनिल महाजन,सागर काळे, सुनिल विंचुरकर, प्रविण पाटील यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments