पोलिसांच्या हाताला झटका देऊन फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराच्या काही तासातच आवळल्या मुसक्या....
काल कोर्टातून कारागृहात नेत असताना पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने हाताला झटका देऊन पळ काढल्याची घटना काल संध्याकाळी अमळनेर येथे बस स्टॅन्ड वर घडली होती.आणि काही तासाच्या आतच आरोपीला पकडण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले असून सदर आरोपी हा गंभीर गुन्ह्यातील आरोपी होता.
राजेश एकनाथ निकुभ उर्फ दादू धोबी रा. अमळनेर असे आरोपीचे नाव आहे.
काल दि.२४ रोजी कोर्टातून कारागृहात नेत असताना पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळ काढला होता.
याबाबत अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल होता सदर आरोपीचा शोध घेणेसाठी पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली आयएसपी बापू साळुंखे, हेड कॉन्स.सुनील हटकर,पो. नि.दिपक माळी, पो. नि. रवींद्र पाटील,पो.कॉन्स्टे. निलेश मोरे,पो. कॉन्स्टे. गणेश पाटील, चालक पो. कॉन्स्टे. सुनील पाटील यांचे पथक नेमण्यात आले होते.
आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी फागणे ( धुळे ) याठिकाणी असुन पुढे सुरतला पळून जात असल्याची माहीती त्याचा साथीदार व सराईत गुन्हेगार तुषार प्रदीप कदम रा.नवल नगर याला ताब्यात घेवून खाक्या दाखवताच तालुका पो. स्टे. धुळे याची मदत घेऊन सराईत गुन्हेगार राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ यास बाळापूर गावा जवळून शिताफीने पकडून अमळनेर पोलीस स्टेशनला आणले व आरोपी पळून गेल्या नंतर पुढील आठ तासात त्याला पुन्हा जेरबंद करत उत्कृष्ट कामगीरी केली आहे.
0 Comments