अमळनेर :- आझाद नायक न्युज
अमळनेर मधील गंभीर गुन्ह्यातील आरोपी राजेश निकुंभ उर्फ दादू धोबी याच्यासह अन्य तीन आरोपींना काल शुक्रवार दिनांक २४ जून रोजी न्यायालयात पोलीस घेऊन गेले होते. यात पोलिस मुख्यालयात कार्यरत रमेश पंढरीनाथ सोनवणे, अनिल बद्रीनाथ पवार राकेश बारकू काळे,भगवान आनंदराव सूर्यवंशी या चौघा पोलीस कर्मचार्यांनी आपल्या सोबत या चारही आरोपींना कोर्टात सादर करून नंतर ते पुन्हा जिल्हा कारागृहाकडे रवाना झाले. त्यांना शासकीय वाहन नसल्यामुळे ते बसने न्यायालयात आले होते. तसेच ते बस स्थानकाकडे निघाले.
बस स्थानकावर पोहोचल्यावर आरोपी दादू धोबी याने पोलिसांना झटका देऊन पळ काढला. या वेळी अनिल पवार व राकेश काळे यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी दादू धोबी हा पोलिसांना सापडला नाही.
या प्रकरणी आता अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादू धोबी हा गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याने तोच पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
0 Comments