अमळनेर :- आझाद नायक न्युज
अमळनेर तालुक्यातील शहापूर येथील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी मारवड पोलीसात नोंदवली आहे.
तालुक्यातील शहापूर येथील १८ वर्षीय तरुणी २७ जून रोजी सकाळी ९ वाजता मारवड येथे मैत्रिणींसोबत दाखला घेण्यास जाते असे तिच्या आईस सांगून घरून निघाली.
संध्याकाळी मात्र ती न परतल्याने तिच्या मैत्रिणीकडे तपास केला.त्यावेळी त्यांनी सांगितले की, मारवड येथे दाखला घेवून आम्ही प्रताप महाविद्यालयात ॲडमिशन घेण्यासाठी अमळनेर येथे गेलो.
दुपारी तीन वाजता कार्यालयात गेलो असता सदर मुलगी ही बाहेरच उभी होती. मात्र बाहेर आल्यावर न दिसल्याने महाविद्यालय आवारात तिचा शोध घेतला. मात्र तरीही ती आढळून न आल्याने सर्व मैत्रिणी घरी आल्याचे त्यांनी सदर तरुणीच्या पालकांना सांगितले.
दरम्यान पालकांनी अमळनेर येथे तसेच नातेवाईकांकडे तपास केला, मात्र कोणताही तपास न लागल्याने सदर तरुणीच्या वडिलांनी मारवड पोलीसात हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments