Header Ads Widget

Responsive Image

अंमळनेरच्या युवकाची क्रेडीट कार्डची क्रेडिट लिमिट वाढवून देण्याच्या नावाखाली १५ हजारात फसवणूक

अमळनेरच्या तरूणाला क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवून देण्याच्या नावाखाली ओटीपी विचारून १५ हजाराची ऑनलाईन फसवणूक 

सविस्तर माहिती अशी की अमळनेर शहरातील इस्लामपूरा भागात राहणारा शेख मोहम्मंद जुनेद (वय-२९) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी व्यवसाय करून आपला उदर निर्वाह करतो १९ एप्रिल रोजी सायंकाळी त्याला ०८८८१०२९१९२ क्रमांकावरून फ्रॉड कॉल आला. समोरील व्यक्ती रोहित सिंग बोलत असल्याची बतावणी करून आपण आयसीआयसीआय बँकेतील कर्मचारी असल्याचे सांगितले. तुमचे क्रेडीट कार्डचे ९० हजाराहून १ लाख ६५ हजार रूपयांचे लिमीट वाढविण्याचे असल्याचे कंपनीने ठरविले आहे.असे सांगून तुम्हाला आलेला ओटीपी गोड बोलून विचारून घेतला. काही वेळेच्या आत त्यांच्या क्रेडीट कार्डच्या माधमातून ५ हजाराचे तिन व्यवहार करण्यात येवून १५ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर शेख मोहमंद यांनी तातडीने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांचे तक्रारीवरून २३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहे.

Post a Comment

0 Comments