Header Ads Widget

Responsive Image

अमळनेर शहरातील मंगल नगर,वैदूवाडा परिसरात बंद घर फोडून २५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना

अमळनेर - आझाद नायक न्यूज प्रतिनिधी ।

शहरातील मंगळ नगर वैदूवाडा परिसरात बंद घर फोडून २५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय प्रभाकर सैंदाणे (वय-३०) रा. ताडेपुरा, मंगल नगर, वैदुवाडी अमळनेर हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २० एप्रिल रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजे दरम्यान ताडेपुरा भागातील संशयित आरोपी सुनील दगडू गव्हाणे आणि एक जण अनोळखी अशा दोघांनी बंद घरात घुसून दरवाजाचा कडीकोडा तोडून घरातील २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संजय सैंदाणे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. सुनिल पाटील करीत आहेत.

Post a Comment

0 Comments