Header Ads Widget

Responsive Image

महाबीज मध्ये बोगस जातींचे प्रमाणपत्र लावुन मिळवली नोकरी..महा पदभर्ती घोटाळा...११ जण अधिकारी कर्मचाऱ्यांवर बरखास्तीची कारवाई

महाबीज मध्ये बोगस जातींचे प्रमाणपत्र लावुन मिळवली नोकरी..महा पदभर्ती घोटाळा...११ जण अधिकारी कर्मचाऱ्यांवर बरखास्तीची कारवाई........

अकोला : महाराष्ट्रात विविध पदभरती मध्ये घोटाळ्याचे सत्र थांबण्याचे नाव घेईना.आरोग्य,शिक्षण व पोलिस भरतीतील महा घोटाळा थांबत नाही तोच आता महाबीज मधील पद भरतीत घोटाळा झाल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे कृषि विभागा चे पितळ उघडे पडले आहे. महाबीज च्या राज्यभरात विविध कार्यालयामध्ये कार्यरत असणा-या ज्येष्ठ व कनिष्ठ अशा विविध पदांवर खोटे जातीचे प्रमाणपत्र लावून ११ जणांनी नोकरी मिळवल्याचे सिद्ध झाले आहे.
या अधिकारी, कर्मचा-यांवर बरखास्ती ची कारवाई करण्यात आल्याची माहिती महाबीजचे माजी केंद्र अभियंता राजेश भगत यांनी दिली.

महाबीज प्रशासनाने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया घेतली. या भरती प्रक्रियेत बोगस जातीचे प्रमाणपत्र लावून काहींनी शासनाची दिशाभूल करीत नोकरी मिळवली. या प्रकारा बाबत महाबीज बहुजन अधिकारी, कर्मचारी संघटना, नागपूर यांनी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे २४ ऑगस्ट २०२१ रोजी तक्रार दाखल केली. मात्र, महाबीज प्रशासनाने कुठलीही कारवाई न करता त्या कर्मचा-यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, संघटना एवढ्यावरच थांबली नाही तर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या निकालाच्या आधारावर विद्यमान महाबीज प्रशासनाने संबधित अधिकारी, कर्मचा-यावर बरखास्तीची कारवाई केली आहे.

यामध्ये नागपुर येथील जिल्हा व्यवस्थापक गणेश महादेव चिरुटकर, गडेगाव जि. भंडारा येथील कनिष्ठ प्रशासन सहाय्यक भिमराव मारोतराव हेडाऊ, शिवनी अकोला येथील कनिष्ठ प्रशासन सहाय्यक एम. एन. गावंडे, हिंगोली केंद्र व्यवस्थापक राजेंद्र जुनघरे, परभणी येथील श्री घावट, जालना येथील शिपाई अजापसिंग घुसिंगे यासह एकुण ११ कर्मचारी अधिकारी यांचा समावेश आहे.
दि. ०३.०१.२०२२ चे कार्यालयीन आदेशाद्वारे महाबीजने खोटे प्रमाणपत्र लावून नोकरी बळकावणाऱ्या विरुध्द रितसर कारवाई करण्यात आली आहे

बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर महाबीजमध्ये नोकरी मिळवल्याची बाब महाबीज प्रशासनाला माहित झाल्यावर महाबीज प्रशासनाने अनेक वर्ष कुठल्याही प्रकारची ठोस अथवा दंडात्मक कारवाई केली नव्हती. परंतु, महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संघटना नागपुर यांचे निवेदन व मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यामुळे महाबीज प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले आहे.
नवीन पदभरती त्वरीत करा :
बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून शासनाची दिशाभूल करणा-या अधिकारी व कर्मचा-याकडून व्याजासह पैसे वसूल करावे तसेच रिक्त झालेल्या जागेवर लवकरात लवकर नवीन पदभरती करून आदिवासी प्रवर्गातील उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी महाबीजचे माजी केंद्र अभियंता तथा अकोला येथील सामाजिक कार्यकर्ता राजेश भगत यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments