शहरातील सिंगापूर, कंजरवाडा यासह जाखनी नगरात अवैध हातभट्टीची गावठी दारु तयार करणार्या अड्ड्यांवर MIDC पोलिसांनी शुक्रवार ४ मार्च रोजी पहाटे पाच वाजता धाड टाकत १ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
MIDC पोलिसात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैध धंदे चालकांच्या गोटात खळबळ
शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंगापूर,कंजर वाडा, जाखनी नगर या भागात अवैध हातभट्टीची गावठी दारु तयार करणाऱ्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकाने शुक्रवार ४ मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कारवाई केली.
या कारवाईत हातभट्टीची गावठी दारु तयार करणारे अड्डे उद्धवस्त करण्यात आले. तसेच १ लाख ७१ हजार ६२० रुपये किमतीचे गावठी हातभट्टीची दारु व ते तयार करण्यासाठी लागणारे कच्चे व पक्के रसायन व दारु बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
यांच्याविरोधात दाखल झाले गुन्हे
एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या कारवाईत वर्षा गोकुळ बागडे (२२), राजेश गुंड्या माछलेकर (४४) अनिता सुधाकर बागडे (५२) अनिता दिलीप माचोरेकर (४३) संजय भटू नेतलेकर (५०) सचिन अशोक रावलकर (३५) सर्व रा.जाखनीनगर कंजरवाडा मंगल कुमार दिववान गुमाने (५०) रा.नवल कॉलनी, संजय गांधी नगर, बादल देवसिंग बाटुंगे (४०) रा.नवल कॉलनी सोनू पवन मलके (२२) रा.नवल कॉलनी ) या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगांव सह तालुक्यात देखील सऱ्हास अवैध दारूचा महापूर वाहतांना दिसत आहे.तर काही तालुक्यात नदी लगतच दारूच्या पोटल्या पिण्यासाठी सकाळी ५ वाजेपासून ते रात्रीच्या १२ ते १ वाजेपर्यंत गर्दी चालु राहते .
याकडे देखील लक्ष दिले तर बरं होईल असा सूर परिसरातून उमटू लागला आहे.
0 Comments