Header Ads Widget

Responsive Image

KYKM फाऊंडेशन आणि खुशीयांन फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम


आदिवासी स्त्रियांना प्रकल्प सक्षम अंतर्गत दुसऱ्या महिन्यातील सॅनिटरी पॅड वाटप

के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि खुशीयांन फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

धुळे : आदिवासी पाड्यावरील स्त्रियांना प्रत्येक महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या वेळी महागडे सॅनिटरी पॅड विकत घेणे परवडत नसल्याने अस्वच्छ कापड वापरून आजाराच्या आहारी जावे लागते.

  याबाबत महिलांना सॅनिटरी पॅड वापरा बाबत सक्षम करण्यासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या प्रकल्प "सक्षम" अंतर्गत खुशीयांन फाऊंडेशन च्या साहाय्याने अवधान येथील वानरदेव वस्ती आणि एकलव्य नगर येथील आदिवासी पाड्यावर सॅनिटरी पॅड वाटण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा हा दुसरा महिना होता, या उपक्रमासाठी खुशीयांन फाऊंडेशनचे संस्थापक चिनू क्वात्रा आणि प्रकल्प समन्वयक तसेच के.वाय.के.एम चे महाराष्ट्र व्यवस्थापन समिती सदस्य वैभव गायकवाड यांच्या वतीने सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात आले,तसेच हे पॅड पुनःवापरता येण्यायोग्य आहेत.

  तसेच प्रकल्प "सक्षम" च्या माध्यमातू न मासिक पाळीच्या वेळी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत दिव्या सावळे यांनी समुपदेशन केले.

  या कार्यक्रमासाठी के.वाय.के.एम फाउंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर आणि सहसचिव चेतन उपाध्याय हे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे नियोजन के.वाय.के.एम च्या स्वयंसेविका ज्ञानेश्वरी बिडवे, भाग्यश्री भावसार, प्रियंका विसपुते, गौतमी कुलकर्णी, अविनाश पाटील, गणेश शेजुळ यांनी केले.
खालील व्हिडीओ ला लाईक share करा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/Y1ZwvBYzIBQ

Post a Comment

0 Comments