अकोला :- शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तर्फे शहरातील कर्कश आवाज करणाऱ्या फटाके, फोडणा ऱ्या बुलेट वाहनांचे सायलेन्सर जप्तीची कारवाई
आज अकोला शहरात दिवसभरात कर्कश् आवाज करणारे वाहन तसेच फटाके फोडणारे बुलेट यांचेवर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत विशेष मोहीम राबवून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.श्री.विलास पाटील,पोलीस निरीक्षक,शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे मार्गदर्शनात शहरातील वर्दळीच्या ठिकाणी,बाजारपेठेत तसेच दवाखाने,शाळा,ट्युशन परीसरात पेट्राॅलींग करून फटाके फोडणा-या 06 वाहनांवर चालकावर कायदेशीर कारवाई करून सदर वाहन जप्त करण्यात आले आहे.
अश्या जप्त केलेल्या वाहनांना 52/192 मो.वा.का अंतर्गत दंड देवुन त्यांचे माॅडीफोईड सायलेन्सर ताबड तोब काढुन घेवुन सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहे.
तरी अश्या प्रकारे कारवाई भविष्यात चालु राहणार असल्याबाबत श्री.विलास पाटील, पोलीस निरीक्षक, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांनी सुचीत केले आहे.
0 Comments