शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत ०१ जानेवारी २०२१ ते आज पावेतो एकुण १०५८५४ वाहन चालक धारकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांचे कडुन ८६३८०००/- रु दंड वसुल करून शासन जमा करण्यात आलेला आहे. वर्ष २०२१ मध्ये अमरावती परीक्षेत्रा मधील सर्व जिल्हयांचे तुलनेत शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कारवाई करण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला विशेष मोहीम अंतर्गत
अवैद्य प्रवासी वाहतुक कलम ६६ / १९२ अंतर्गत एकूण ३१५ केसेस,
ऑटो फ्रंट सिट प्रवासी वाहतुक कलम १२५/१७७ अंतर्गत एकुण १४०१ केसेस,
वाहन चालवितांना मोबाईल वर संभाषण करणे कलम २५० (A) / १७७ अंतर्गत एकुण २९८४ कसेस,
सिंग्नल तोडुन वाहतुक करणे २४(२)/ १७७ अंतर्गत २२३९९ केसेस
भरधाव वेगात वाहन चालवणे कलम ११२/१८३(१) अंतर्गत ४२५४ केसेस,
विना परवाना वाहन चालवणे कलम १३० (१)/१७७ अंतर्गत ५१९७२ केसेस,
विना सीटबेल्ट १३८ (३) / १७७ अंतर्गत ८०१६ केसेस करून दंड वसुल करण्यात आलेला आहे.
विशेष मोहीम दरम्यान शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत फटाके फोडनाऱ्या सायलेन्सरचा वापर करून शहरात ध्वनी प्रदुषणात वाढ करणाऱ्या एकुण १०४ बुलेट धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
प्रवासी व महिला सुरक्षेबाबत विशेष मोहीम अंतर्गत शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला द्वारे सुचना फलक / स्टिकर्स तयार करून शहरातील एकुण १२८९२ ऑटोवर सदर स्टिकर्स लावण्यात आलेले आहेत.
दरम्यान मागील आठवड्यात नागरीकांचे हरविलेले ०३ मोबाईल व ०२ बॅग ट्रॅफीक अमलदारांकडुन त्यांच्या मुळ मालकास परत करण्यात आले.
विलास पाटील
पोलीस निरीक्षक
शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला,
0 Comments