Header Ads Widget

Responsive Image

अकोट ग्रामीण पोलिसांची गोवंश मांस विक्रेत्यांवर कार्यवाही....


अकोट ग्रामीण पोलिसांची गोवंश मांस विक्रेत्यांवर कार्यवाही....

देवानंद खिरकर -

 अकोट ग्रामीण पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्या वरून अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पो.उप.निरीक्षक विजय पंचबुधे,पोलीस अंमलदार दादाराव लिखार,पो हे का गजानन भगत,एनपीसी योगेश जऊळकार,सुनील वैराळे, महिला अंमलदार अनिता सपकाळ,यांनी ग्राम मोहाळा येथील शेख मुख्तार शे गणी वय 45 वर्ष हा त्याचे हबीब नगर येथील राहते घरी गोमांशची कत्तल करून गोमांश विक्री करत असल्याबाबत मिळाले ल्या गुप्त माहिती वरून छापा मारला असता आरोपी शेख मुख्तार शे गणी याला गोमांश विक्री करत असताना रंगेहात पकडले असून.

  आरोपी कडून गोमांश,सुरा,तागडे वजन,असा ऐकून 8000 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही मा.उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर,यांचे मार्गदर्शनखाली अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, उप निरीक्षक विजय पंचबुद्धे,अंमलदार दादाराव लिखार,गजानन भगत,योगेश जऊळकार,सुनील वैराळे,महिला अंमलदार अनिता सपकाळ,यांनी केली असुन पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments