धुळ्यात साडे सात लाखाचे ब्राऊन शुगर जप्त...आंतर राष्ट्रीय बाजारात सुमारे दीड कोटी पेक्षा अधिक किंमत
देशातील बॉलीवूड सेलिब्रेटी ड्रग्ज प्रकरणात पकडले जात असतानाच धुळ्यातही नाशिकच्या विशेष पथकातील पोलिसांनी मोठी कारवाई करीत सुमारे साडेसात लाख रुपये किंमतीची तब्बल अर्धा किलो ब्राऊन शुगर जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भुसावळ येथील एका संशयितास अटक करण्यात आली.
रात्री उशिरापर्यंत धुळ्यातील मोहाडी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जप्त ब्राऊन शुगरची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे दिड कोटींहून अधिक किंमत असल्याचे सांगण्यात आले.
धुळे शहरातील मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या हॉटेल रेसीडेन्सी पार्कजवळ एक संशयीत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधीत ब्राऊन शुगरच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नाशिक आयजींच्या विशेष पथकाला मिळाली. पथकाने स्थानिक मोहाडी पोलिसांच्या मदतीने सापळा रचत.
संशयीतास अटक करून त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे ब्राऊन शुगर आढळली. ब्राऊन शुगरची मोजणी केल्यानंतर तिचे वजन 500 ग्रॅम आढळले. सुमारे साडेसात लाख रुपये किंमतीची ब्राऊन शुगर ची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे दिड कोटींपेक्षा अधिक किंमत असल्याचे सांगण्यात आले.
0 Comments