Header Ads Widget

Responsive Image

धुळे :- बनावट मद्याच्या अवैध स्पिरिट रसायन ने भरलेले दोन ट्रँकर जप्त

धुळे, 9 ऑक्टोबर (हिं.स.) शिरपूर तालुक्यातील दहिवद शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर एका हॉटेलच्या आवारात बनावट मद्यासाठी वापरले जाणारे स्पिरीट रसायन भरलेले दोन टँकर नाशिकच्या आयजी पथकाने पकडले आहे.

या टँकरमधून दोन ड्रममध्ये स्पिरीट टाकण्यात आले होते. ९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.शिरपूर तालुक्यातील बनावट मद्याच्या अवैध धंद्याचा मोठा खुलासा यातून होत असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात आयजी पथकातील पोलिसकर्मचारी बशिर गुलाब तडवी यांनी फिर्याद दिली आहे.

नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष आयजी पथकाने शिरपूर तालुक्यातील दहिवद शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल मॉ करणी समोरील आवारात छापा टाकला असता टँकर क्रमांक यु.पी.१५ ई.टी.३५४१ आणि ट्रँकर क्रमांक यु.पी.१५ ई.टी.६५६१ हे दोन टँकर नियोजित ठिकाणी न पोहचवता टँकर चालक आणि त्याच्या साथीदारांनी परस्पर स्पीरीटची हेराफेरी करण्याच्या उद्देशाने येथे थांबवले. त्या टँकरमधून २०० लिटर क्षमतेच्या प्लास्टीक ड्रममध्ये स्पीरिट काढण्याचे काम अवैध आणि धोकादायक पध्दतीने करण्यात येत होते. पोलसांचा छापा पडताच काही आरोपी घटनास्थळा वरुन पसार झाले.मात्र त्याठिकाणाहुन पथकाने २ टँकर पडले. यातील प्रत्येक टँकर आणि रसायनाची एकूण किंमत ४१ लाख ६३ हजार ५०० रुपये इतकी असून दोन्ही टँकर मिळून ८५ लाखाचा मुद्देमाल तसेच टँकरमधून चोरलेले स्पिरीट वाहुन नेण्यासाठी ३ लाखाची एक महिंद्र एक्स गाडी देखील या ठिकाणी आढळून आली आहे. पोलिसांनी तिघे वाहने जप्त केली.

तसेच एक आरोपीकडील १० हजाराचा मोबाईलही आणि ५ हजाराची रोकड हस्तगत केली आहे.. याप्रकरणी टँकर चालक राजकुमार हरपालसिंग (वय ३८) व इम्रान खान छुत्तन खान (वय ३४) दोघे रा.उत्तरप्रदेश आणि स्थानिक आरोपी बापू उर्फ मनोज भालचंद्र वाणी रा.शिरपूर तसेच बापु वाणीचे इतर तीन सहकारी अशा ६ जणांच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४०७, ३७९ व दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments