Header Ads Widget

Responsive Image

एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसेचे यांच्यावर अटक वारंट...राजकीय वर्तुळात खळबळ

एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसेचे यांच्यावर अटक वारंट...राजकीय वर्तुळात खळबळ 

मुंबई ( प्रतिनिधी ) – भोसरी येथील बहुचर्चित भूखंड घोटाळा गुन्ह्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्यावर अटक वॉरंट बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

एकेकाळचे भाजपाचे फायरब्रँड नेते मात्र नंतर पक्षांतर्गत मतभेदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथराव खडसेंना हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा गुन्ह्यात मंदाताई खडसे यांच्याविरोधात आज मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सुनावणीदरम्यान त्यांचा अर्ज फेटाळून लावला गेला त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झालं , अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे. अंजली दमानिया यांनीच तक्रार दाखल केली होती. एकनाथराव खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणांमुळे दिलासा मिळाला असून त्यांच्याबाबत पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

पुण्यातील भोसरी जमीन व्यवहारातील कथित घोटाळ्यात एकनाथराव खडसे यांची ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली होती. त्यांच्यावर कारवाई होण्याची देखील शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी मंदाताई खडसे यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.
ईडीनं सत्र न्यायालयापुढे दाखल केलेल्या चार्जशीटसंदर्भात मंदाताई खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. पण हे ऐकून वाईट वाटतंय. कारण कर्ते-करविते कोण होते आणि भोगायला कुणाला लागतंय. कारण एकनाथराव खडसेंनी केलेल्या चुकीच्या कामाचे हाल त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या जावयाला भोगावे लागत आहेत. पण यातून मार्ग तरी नक्कीच निघेल. त्यांनी केलेला भ्रष्टाचार नक्कीच पुढे येईल. सगळे राजकारणी प्रकृतीचं कारण सांगून जेलमधून किंवा तपासातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांना कायद्याला सामोरं जावं लागणार आहे”, असं अंजली दमानिया म्हणाल्या मंदाताई खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झालं असून हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.
एकनाथराव खडसे महसूल मंत्री असताना हा व्यवहार झाला होता एकनाथराव खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता ईडीनेसुद्धा चौकशी सुरू केली आहे. खुद्द एकनाथराव खडसे, मंदाताई खडसे आणि गिरीश चौधरी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यापैकी गिरीश चौधरी सव्वा तीन महिन्यांपासून कारागृहात आहेत. एकनाथराव खडसे यांची ईडीने आधी चौकशी केलेली असली तरी मंदाताई खडसे मात्र अद्यापपर्यंत इडीसमोर हजर झालेल्या नव्हत्या. त्यांनी आपण आजारी असल्याचे पहिल्यांदा सांगितले होते दुसऱ्यांदा त्यांनी मुदत वाढवून मागितली होती. सतत गैरहजर राहत असल्यामुळे आज मुंबई येथील सेशन कोर्टाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले आहे. यामुळे मंदाताई खडसे यांना अटक होण्याची शक्यता आहे.

मंदाताई खडसे ईडीच्या रडारवर आहेत. या व्यवहारात मदत केल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना ईडीने अटक केली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. मुंबई सेशन कोर्टाने सुनावणी आता २१ ऑक्टोंबर रोजी ठेवली आहे.


Post a Comment

0 Comments