Header Ads Widget

Responsive Image

चोरीच्या घटनांना आळा.....
ग्रामीण ठाणेदार नितीन देशमुख ....

देवानंद खिरकर - पोलीस स्टेशन अकोट ग्रामीणकडून ग्रामीण भागातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मा.पोलीस अधीक्षक अकोला श्री.जी.श्रीधर,मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत, मा.सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट श्रीमती रितू खोकर ह्यांचे मार्गदर्शनाखाली "माझे गाव,माझी सुरक्षा"ही योजना राबविण्यात येत असून त्या योजने अंतर्गत दिनांक 12/10/2021 चे रात्री पो.स्टे. अकोट ग्रामीणचे हद्दीतील ग्राम बोर्डी येथे psi श्री डाखोरे,pc श्री.आठवले, चालक श्री.आस्वार, होमगार्ड श्री. मोईन,होमगार्ड श्री.डहाके ह्यांनी पो स्टे अकोट ग्रामीण हद्दीतील ग्रामीण भागातील चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे उद्देशाने ग्रामीण भागात तयार करण्यात आलेल्या ग्राम सुरक्षा दल व नवदुर्गा मंडळाचे सदस्यांसोबत ग्राम बोर्डी ह्या गावात रात्री गस्त करण्यात आली.

तसेच ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य तसेच दुर्गा मंडळाचे सदस्य व गावातील इतर नागरिक ह्यांना रोज गस्त घालनेबाबत व गस्त कशी करावी ह्या बाबत सूचना देण्यात आल्यात.

यावेळी ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य व गावातील युवकांसोबत गावात गस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.यावेळी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, समाधान चंदन,व युवा मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments