Header Ads Widget

Responsive Image

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी अकोल्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

अकोला, दि. 29 मे : देशभरात गाजत असलेल्या NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले.

संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, NEET-UG 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीमुळे देशातील सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि पालकांच्या आर्थिक-मानसिक संघर्षावर पाणी फेरले गेले आहे. या प्रकारामुळे देशाच्या परीक्षा व्यवस्थे वरील विश्वास हादरला असून अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या अत्यंत गंभीर प्रकरणाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री Dharmendra Pradhan यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

 NEET ची फेरपरीक्षा घेण्याचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करावे व ही परीक्षा पूर्णपणे विनामूल्य घेण्यात यावी.

 Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024 ची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी.
 केंद्र सरकारने तात्काळ Radhakrishnan Committee यांच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आणि NEET परीक्षा घेण्याची जबाबदारी National Testing Agency (NTA) कडून काढून Union Public Service Commission (UPSC) कडे द्यावी.

 देशभरातील विविध राज्यांमध्ये झालेल्या संघटित प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणांबाबत NTA ची सखोल चौकशी करण्यात यावी, कारण यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य आणि करिअर धोक्यात आले आहे.

शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण तात्काळ थांबवावे. केंद्र सरकार आणि Maharashtra राज्य सरकारने व्यावसायिक कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा लागू करावा.
ज्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली त्यांचे आत्महत्या प्रकरणी धर्मेंद्र प्रधान, नीट चे अधिकारी आणि आता राज्यात अटक केलेल्या सर्व आरोपी विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष इंजि.धिरज इंगळे यांनी केले. शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी धैर्यवर्धन पुंडकर सर राज्य उपाध्यक्ष, प्रमोद देंडवे जिल्हाधक्ष, मिलिंद इंगळे महासचिव, राजकुमार दामोदर युवक आघाडी जिल्हा महाचिव,गजानन गवई,अक्षय डोंगरे, अनिकेत शिरसाठ, अंकुश धुरंधर,सोमेश दाभाडे,सम्राट वाहुरवाघ,प्रतुल विरघट,मजहर खान, दामोदर जगताप,अंकुश बलखंडे,मनोहर बनसोड,सौरभ बहादुरकर, शैलेश शिरसाठ,आदित्य तायडे,नंदकुमार डोंगरे,नागेश हेरोळे, नागेश उमाळे, आकाश जंजाळ, आर्यन वानखडे, रोशन ताजने, राजू बोदडे,प्रदीप इंगळे, सुनीता हिरोळे, लक्ष्मी वानखडे,अनुराधा ठाकरे, वैभव भटकर,प्रसाद बेलूलकर , सुभाष अवचार, दुर्गा अवचार, अमोल वानखडे,संदेश तायडे , मनोहर वानखडे, सुगत डोंगरे, दादाराव पवार, प्रदीप इंगळे,कार्तिक देशमुख, शुभम सौतकर, सागर इंगळे, राहुल सुरवाडे, साहिल बोदडे, आशिष सोनोने, भूषण वानखडे, योगेश वडाळ, शेखर इंगळे, नितीन सपकाळ, पराग गवई,निलेश देव, सम्राट तायडे,सुरेंद्र ऑइबे, शुभम नाईक गोलू खिल्लारे, राहुल लवाळे, यासह विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments