Header Ads Widget

Responsive Image

अकोला जिल्ह्यातील कोरोना आजारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाचा एक वर्षाचा घर टॅक्स व नळ टॅक्स माफ करा.



अकोट प्रतिनिधी देवानंद खिरकर


अकोला जिल्ह्यातील कोरोना आजारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाचा एक वर्षाचा घर टॅक्स व नळ टॅक्स माफ करा....

युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निनाद मानकर यांची मागणी...

 
मागील वर्षभरापासून कोरोना या वैश्विक महामारी मुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहे,उघड्यावर आली आहेत.लॉकडाऊन मूळे अनेक लोकांची व्यवसाय,रोजगार बंद झाले आहे.यामुळें १० जून रोजी युवक काँग्रेसच्या वतीने नगरविकास मंत्री ना एकनाथ शिंदे यांना मा.जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले की अकोला जिल्ह्यातील कोरोना आजारा मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाचा एक वर्षाचा घर टॅक्स व नळ टॅक्स माफ करावा व त्यांना या काळात दिलासा द्यावा असे निवेदन युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निनाद मानकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले यावेळी अकोट विधान सभा युवक काँग्रेसचे मा.अध्यक्ष प्रतीक गोरे,सौरभ देशमुख,जिल्हा महासचिव सय्यद हैदर अली व मयूर निमकर,शुभम तिडके,कुणाल जोत हे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments