गणेश पाटील असे लाच मागणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव असून ते रामदास पेठ पोलीस स्टेशन ठाणेदार यांचे रायटर म्हणून काम पाहत असल्याची माहिती असून त्यांनी एका दारू विक्रेत्याला पैश्याची मागणी केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत दारू विक्रेत्या संबंधित व्यक्तीला रामदासपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांचे रायटर गणेश पाटील याने लाचेची मागणी केली. तक्रारकर्त्यास लाच देणे मान्य नसल्याने त्यांने एसीबीकडे तक्रार केली.
लाचेच्या मागणीची पडताळणी करून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रामदासपेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार रायटर यास ताब्यात घेतले. सदर लाचेची मागणी रक्कम ही 27000/- रुपये असून ती रक्कम स्वीकारताना रायटर (पोलीस कर्मचारी) गणेश पाटील यांना दुपारच्या सुमारास रंगेहात अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढील तपास करीत आहे.
0 Comments