Header Ads Widget

Responsive Image

अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळालेले अनमोल रत्न म्हणजे ज्ञानोबा फड साहेब



अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळालेले अनमोल रत्न म्हणजे ज्ञानोबा फड साहेब

  
आझाद नायक न्युज सोबत ह.भ.प. गणेश महाराज शेटे....प्रतिनिधी देवानंद खिरकर व मुख्य संपादक मुकेश भावसार 
 आमच्या अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका हा अति संवेदनशील तालुका मांनल्या जातो आणि येथे सर्व जाती धर्माचे मंडळी पाहायला मिळते अशातच कधी, कधी दंगल सुद्धा घडून आलेले आहेत बऱ्याच वेळेस आम्ही गणपती उत्सव, नवरात्र उत्सव , श्रावण महिन्यातील कावड, मुस्लिम धर्मातील ईद अशा या उत्सवाच्या वेळेस जिल्ह्याच्या ठिकाणी नसणारा बंदोबस्त आम्हाला आकोटात पाहायला मिळालेला आहे. तसा आमचा तालुका संतांचा वारसा असणार आहे या पवित्र भूमीमध्ये संत नरसिंग महाराज, संत शिवराम महाराज, संत वासुदेव महाराज, संत भास्कर महाराज, संत चतुर्भुज महाराज आदी करून संत-महात्मे अवतीर्ण झाले आहेत म्हणून अकोट तालुका नेहमी भक्तीमय वातावरणात वाढलेला आहे अशा या संत भूमीला  यात्रा ,उत्सव असले म्हणजे पोलीस प्रोटेक्शन ची गरज पडायची पोलीस खातं म्हटलं सर्वसामान्य माणूस आधीच घाबरतो पण अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन ला जेव्हापासून ज्ञानोबा फड साहेब रुजू झाले तेव्हापासून पोलिसाच्या बद्दल मनात भीती होती ती भीती मात्र नाहीशी झाली माझ्या माहितीप्रमाणे ज्ञानोबा फड साहेब हे मूळचे गंगाखेड ,परळी वैजनाथ या परिसरा तील आणि विशेष वारकरी संप्रदाय घराण्यातील आमच्या गावी योग योगेश्वर संस्थांना आम्ही साहेबांना कोरोना योद्धा पुरस्कार देण्या करिता आमंत्रित केले होतं त्यावेळेला साहेब बोलताना सांगत होते आमच्या घरामध्ये आमची भावंडांची नावे सुद्धा संतांचीच आहेत निवृत्ती, ज्ञानदेव सोपान, मुक्ताई पूर्ण घरांन वारकरी संप्रदाया चा आहे माझ्या माहितीप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथाचे साहेब गाढे अभ्यासक आहेत बरेच अभंगही पाठ आहेत त्यांची कार्य करण्याची पद्धत इतरांपेक्षा काही वेगळी आहे काही दिवसा आधी वारी हनुमान येथे काही मुलं पोहण्याकरता गेले होते आणि त्यामध्ये एक मुलगा मामा भाषा च्या डोहा मध्ये अडकला व मरण पावला पण डेड बॉडी बाहेर काढण्याकरता कोणी तयार नव्हतं कारण आज पर्यंत त्या डोहामध्ये ज्यांनी उडी मारली तो परत आलाच नाही पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता साहेबांनी स्वतः त्या डोहामध्ये उडी टाकली आणि डेड बॉडी बाहेर काढली, एक प्रकरण असे घडले कृषी उत्पन्न बाजार समितीतून आपल्या शेतीतील माल विकला व परत जाताना मला काही गुंडांनी अडवलं व माझ्या जवळील रोख रक्कम हिसकावून घेतले अशी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली पण साहेबांनी अवघ्या दोन दिवसात रोख रक्कम चोरणाऱ्या चोराल पकडले पण आश्चर्य त्या वेळेस वाटलं रोख रक्कम चोरणारा ही तोच होता ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती  मी साहेबांना विचारलं साहेब तुम्ही एवढ्या लवकर हा तपास लावला तरी कसा तर साहेबांनी सांगितलं माझी अकोट तालुक्यातील जनतेसोबत एक नाळ जोडलेली आहे मी सर्वसामान्यांच्या सोबत सामान्य माणसा सारखा राहून कार्य करतो कुठल्याही प्रकारची जात ,पात, धर्म, पंथ न पाहता त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये जातो आणि आकोट तालुक्यातील जनता सुद्धा खूप आदराने आपल्या गावात कोणताही कार्यक्रम असो इथे त्यांना आवर्जून बोलावतात साहेबांच्या या कार्याचे कौतुक बऱ्याचदा गृहमंत्र्यांनी सुद्धा केले आहेत त्यांच्या साथीला अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार महल्ले साहेब खांद्याला खांदा लावून काम करतात आज माननीय ज्ञानोबा फड साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे त्यांनी केलेल्या कार्याची पावती सर्वसामान्य जनतेपर्यंत पर्यंत पोहोचावी त्याकरिता हा छोटेखानी लेख लिहिण्याचा प्रयत्न केला या पूर्ण लिखाणा चा अर्थ ऐवढाच आहे आमच्या आकोट ग्रामीण पोलिस स्टेशनला मिळालेले अनमोल रत्न म्हणजेच माननीय ज्ञानोबा फड साहेब मी गणेश महाराज शेटे माझ्या विश्व वारकरी सेनेच्या वतीने साहेबांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
आझाद नायक परिवाराकडून देखील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

Post a Comment

0 Comments