अमळनेर मधील पानखिडकी भागातील रहिवासी श्री. गोपीचंद माधव भावसार
यांना 1 मुलगी व 2 मुलं असा परिवार आहे .
त्यात मुलगी कु. जयश्री ही जन्मतः अपंग आहे व 2 मुलं आहेत 1 नरेंद्र व दुसरा कुणाल नरेंद्र हा कुरिअरचे टपाल वाटप चे काम करतो परंतु सध्या लॉक डाऊन असल्या कारणाने 2महिन्या पासुन तोही घरीच आहे व लहान मुलगा कुणाल याला 6 महिन्या पासुन लकव्या ने ग्रासले आहे.
कुणाल ला महिन्याचे 3 ते 4 हजार रुपयाचे औषधांचा खर्च आहे. व त्यात अपंग बहीण घरात आहे व तिला कुठल्याच प्रकारच्या शासनाच्या योजनां चा लाभ मिळत नाही आहे.
शासनांच्या अपंगांसाठी विविध योजना असतांना या तरुणीचे अद्याप आधार कार्ड नाही व आता कमवते मुलांबरोबर काळानेंअसा घाला घातला आहे की त्यांना एक वेळ जेवणाची सोय होईल का याचे टेंशन आले व त्यात औषध उपचार करण्याचे टेंशन आले आहे.
तरी अश्या परिवारकडे जगण्याचे साधन नसतांना शासनाने स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा दानशूर व्याक्तिंनि मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे.
व त्या दिव्यांग तरुणी साठी शासनाची मदत पोहचली पाहिजे..
तरी शासनाने लोकप्रतिनिधींनी दानशूर व्याक्तिंनि यां परिवाराला लवकरात लवकर शासकीय मदत करावी ही विनंती..
परीवारच्या इतर माहिती साठी क्रुपया संपर्क साधा.
सुधीर भावसार..9422733875
विक्कि ( मुकेश ) भावसार
संपादक
आझाद नायक न्युज
9146767071 / 9028224282
0 Comments