आजच्या 100 वर्षापूर्वी भावसार समाजाचे थोर कीर्तनकार वारकरी तसेच पांडुरंगाचे निस्सीम भक्त श्री.ह.भ.प. श्रींधर महाराज शेवगेकर ( भावसार ) यांच्या यंदाच्या वारीला 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचा धार्मिक कार्याचा व त्यांना आलेल्या अनुभुतीचा हां वृतांत
श्रीं ह. भ. प. श्रींधर बुवा भावसार हे जळगाव खान्देश मधील पारोळा तालुक्यातील शेवगे येथील रहिवाशी गावोगावी जाऊन किराणा सामान विक्री करत विक्री विक्री करता करता पांडुरंगा चे नामस्मरण करत संसाराचा गाडा तर त्यांनी सुरूच ठेवला परंतु त्या सोबत त्यांनी पंढरीची वारी देखील न चुकता केली.ते एकटे पंढरीची वारी करु लागले. नंतर दिंडीत 2 , 4,6,10 ,15, 20 अशी संख्या वारीत वाढत गेली या सर्वांचा खर्च श्रीधर बुवा स्वतः करीत नंतर त्यांचा कार्याची अनुभुती आजुबाजु च्या गावात पसरली नंतर ज्या गावात मुक्कामाला असायचे तेथे कीर्तन हरिपाठ नित्य नियमाने करायचे, व गावातील काहीं लोकांना श्रीधर बुवांच्या मधुर वाणीतील भजन कीर्तनाने गावांतील लोक त्रुप्त व आनंदी होत.
श्रींधर बुवा यांना दोन मुलं व 1 मुलगी झाली 1 माधव बुवा , दुसरे रामदास बुवा वडीलांप्रमाणेच माधव बुवांना पांडुरंगाचे लहानपणा पासुनच वेड लागले वडिलांन सोबत किराणा भूसार मालाचे दुकान सांभाळुन ते हीं हरिपाठ भजन कीर्तन नित्य नियमाने करु लागले. व वडिलांचा दिंडीचा वसा कायम केला आता 40 ते 50 वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरीची वारी नित्य नियमाने करु लागले.
ह. भ. प. श्रीधर महाराजां सोबत ह. भ. प. माधव बुवाची देखील प्रत्येक गावात ख्याती वाढु लागली पुढे काहीं दानशूर व्यक्तींनी दिंडीला स्वखर्चाने नाश्ता जेवण देत व जेथे मुक्काम असेल तेथे कीर्तनाचे कार्यक्रम देखील होत असे.
ह. भ. प.माधव बुवा यांना 3 मुलं 2 मुली झाल्या 1. ताराचंद 2. गोपीचंद 3.छोटूभाऊ 4. उषाबाई 5.आशाबाई
कालांतराने हीं दिंडी ह. भ. प. श्रीधर बुवांच्या नावानेच चालु लागली व ह. भ. प. माधव बुवांनी या दिंडी चे स्वरूप वाढवले वृध्दकाळात देखील माधव बुवा यांनी दिंडी चालवली नंतर यां दिंडी ची सूत्रे व परंपरा ताराचंद बुवा (आप्पा )
यांच्या खांद्यावर आली नोकरी करून हरीपाठ नित्य पूजा करून ताराचंद बुवानी दिंडी त येणाऱ्या प्रत्येकाची सोय अगदी योग्य पध्दतिने केली सगळ्यांची एक दिवस अगोदर येणाऱ्या वारकरी ची जेवणाची राहण्याची कोणाला दवाखाना लागला परतीच्या वेळेस पैसे नसतील तेही त्यांनी त्यांचा परीने मदत केली .
आता त्यांचा सोबत त्यांचे लहान भाऊ गोपीचंद बुवा देखील वारीला नित्य नियमाने जाऊ लागली व सोबत त्यांची बहीण उषाताई देखील नित्य नियमाने जाऊ लागल्या. व आपल्या आजोबांची परम परंपरा कायम ठेवली .
पुढे दिंडी चे स्वरूप खूपच वाढले 100 - 150 वारकऱ्यांना सोबत घेऊन हीं दिंडी पंढरीत दाखल व्हायची पुढे ताराचंद आप्पा यांनी दिंडी सूत्रे हीं ह.भ.प.प्रकाश महाराज चंदेले यांचा कडे सोपवली व 14/ 3/17 ला वैकुंठवाशी झाले.
ह. भ. प. प्रकाश महाराज यांनी आता पर्यंत दिंडी व समाधीची सेवा व्यवस्थित अखंडित चालु ठेवली व जो पर्यंत मी जिवंत आहे तों पर्यंत नीत्त्य नियमाने चालु ठेवीन अशी ग्वाही दिली .
श्रीं. ह. भ. प. श्रीधर महाराज यांची अमळनेर येथे तानाजी महाराज मठात आज हीं समाधी आहे गेल्या वर्षीच ताराचंद आप्पा यांचे सुपुत्र सुधीर भावासार यांनी स्वखर्चाने समाधीच्या जीर्णोद्धार केला तसेच समाधी वर प्रकाश महाराज नित्य नियमाने दररोज आरती पूजा हरिपाठ करतात.
सध्या या दिंडी चे चालक ह. भ. प. प्रकाश महाराज हे आहेत व यावर्षी कोरोना 19 व्हायरस नें संपूर्ण जगात थैमान घातले आहे अश्या स्थितीत ह्या वर्षीची वारी हीं समाधी वरच सोशल डिस्टंट ठेवून हरिपाठ कीर्तन करू. असे समाधान व्यक्त केलें.
वैकुंठवासी ह. भ. प.माधव बुवा भावसार
(आप्पा )भावसार
2 Comments
श्री राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
ReplyDeleteजय जय राम कृष्णा हरि
Delete