Header Ads Widget

Responsive Image

अंमळनेरकरांची आर्त टाहो..हक्काचं पाणी द्या..हो 10 दिवसापासून अमळनेरकर पाण्यासाठी परेशान..

अमळनेर :- आझाद नायक न्यूज,
विकी भावसार,पंकज भावसार

ऐन सणासुदीला अमळनेरचे नागरिक पिण्याचा पाण्यापासून वंचित..

आज आखाजी (अक्षय तृतीया) खान्देशातील सर्वात मोठा सण
पण लोकांचा घरात प्यायला पाणी नाही..

आज खान्देशाचा सर्वात मोठा सण आखाजी ( अक्षय तृतीया ) सारखा सण असतांना अमळनेर नगरपरिषदेने राजाराम नगर,गोहिल नगर, त्रिमूर्ती नगर,विराज पार्क, रघुराजस नगर,येथे गेले १० दिवसापासुन नळच आले नाही ऐन सणासुदीला नागरिकांना प्यायला पाणी नाही.
अमळनेर मध्ये अजून काही प्रभाग आहेत तेथे पाणीपुरवठा सुरळीत नसुन नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे . 
 काही भागातीलच नगरसेवक हे प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवित असुन काही नगरसेवक फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.
  राजाराम नगरातील नागरिकांनी वारंवार तक्रार देऊन निवेदन देऊन नगरपालिका प्रशासन जर त्यांचा समस्या सोडविण्यात अपयशी होत असेल तर नागरिकांनी समस्या कोणाकडे मांडाव्यात.
  अश्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
तसेच नागरिकांनी आझाद नायक न्युज प्रतिनिधि पंकज भावसार यांच्या सोबत बोलतांना आपला संताप व्यक्त केला .

Post a Comment

0 Comments