Header Ads Widget

Responsive Image

रिक्षा चालकाच्या मुलाची C.A. परीक्षेत उत्तुंग भरारी...

आझाद नायक न्युज :- अमळनेर विक्की भावसार 
कल्पेशचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन ध्येय गाठावे......चंदुसिह परदेशी 

    अमळनेर येथील पानखिडकी भागातील रिक्षाचालक दीपक भाऊ बाविस्कर (पाटील) यांचा चिरंजीव कल्पेश दीपक पाटील उर्फ बाविस्कर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही प्रतिष्ठेची पदवी मिळवून मोठे यश संपादन केले आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारे माजी नगरसेवक मुन्नाभाई शर्मा व चंदू बाबा परदेशी यांनी आज त्यांच्या घरी जाऊन कल्पेशचा तसेच त्यांच्या आजी, आई-वडिलांचा सत्कार करून अभिनंदन केले.
कल्पेशने बारावी नंतर स्वतः काम करून आपले शिक्षण पूर्ण केले. पुणे येथील एस.पी. कॉलेज, डेक्कन येथे त्याने ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेतले. कोरोना काळात तो अंमळनेरला परत आला आणि येथेच आर्टिकलशिप व सीए परीक्षेची तयारी केली. त्यानंतर पुन्हा पुण्यात जाऊन कठोर परिश्रम, जिद्द आणि ध्येयाच्या जोरावर त्याने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण केली.
सततची मेहनत, परिस्थितीवर मात करण्याची ताकद आणि ध्येय गाठण्याची जिद्द यामुळे कल्पेशने हे यश मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे पानखिडकी परिसरासह संपूर्ण अंमळनेर शहरात आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी मुन्नाभाई शर्मा आणि चंदूसिंग परदेशी यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि होतकरू युवकांना आवाहन केले की, कल्पेशसारख्या जिद्दी आणि मेहनती मुलाचा आदर्श समोर ठेवून प्रत्येकाने आपले ध्येय गाठावे आणि समाजासाठी काहीतरी चांगले कार्य करावे.

Post a Comment

0 Comments