Header Ads Widget

Responsive Image

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे जाळण्याचे कृत्य करणाऱ्यांवर राष्ट्रविरोधी कलमान्वये कारवाई करा

अकोला :- आझाद नायक न्युज 
   मुकेश भावसार

वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी
 
 मध्य प्रदेशात अत्यंत निंदनीय आणि राष्ट्रविरोधी घटना घडली काही समाज विरोधी घटकांनी मध्य प्रदेश राज्याच्या हद्दीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे जाळण्याचे घृणास्पद कृत्य केले , असे राष्ट्रविरोधी कृत्य केल्याच्या संदर्भात आज वंचित बहुजन युवा आघाडी जिल्ह्याच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक अकोला यांना कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून तर ते भारताच्या अस्मितेचे प्रतीक आहेत त्यांच्या पुतळ्यांचा अपमान करणे हा संविधान आणि देशाच्या लोकशाही मूल्यांवर थेट हल्ला आहे.
समाजविरोधी घटकांची मानसिकता : - ही घटना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदलांच्या भीतीने आणि दलित स्वाभिमानाबद्दल द्वेषाच्या मानसिकतेने प्रेरित आहे. संविधानाने दिलेल्या समानतेच्या तत्त्वाला आव्हान देणारी ही "मनुवादी" प्रवृत्ती समाजात द्वेष पसरवून देशाचे विभाजन करण्याचे एक मोठे षडयंत्र असू शकते ही घटना मध्य प्रदेशात घडली आणि प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनता किंवा मूक पाठिंब्याशिवाय असा धाडस करणे शक्य नाही जर अशा राष्ट्रविरोधी घटकांवर तात्काळ कठोर कारवाई केली गेली नाही तर याकडे सरकारी संमती म्हणून पाहिली जाईल असा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे.
   या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, मध्य प्रदेश पोलिसांनी तात्काळ राष्ट्रविरोधी क्रियाकलाप कायदा आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हेगारां वर गुन्हा दाखल करावा व या घटनेमागील मुख्य कट रचणाऱ्यांना ओळखून त्यांना कठोर शिक्षा करावी या मागणीचे निवेदन वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे यांच्या मार्गदर्शनात युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे पाटील, जिल्हा महसाचिव राजकुमार दामोदर यांनी पोलिस अधीक्षक अकोला यांना दिले यावेळी महानगर अध्यक्ष वैभव खडसे, बाळापूर तालुका अध्यक्ष सुगत डोंगरे, माजी महानगर अध्यक्ष जय तायडे, प्रसिध्दी प्रमुख आकाश जंजाळ, मीडिया प्रमुख सूरज दामोदर,रविभाऊ गीते, अमोल वानखडे उपाध्यक्ष, विजय डोंगरे, शेट्टी डोंगरे, सचिन डोंगरे, अमोल वानखडे आदेश उमाळे, यासह जिल्हा महानगर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
       

Post a Comment

0 Comments