Header Ads Widget

Responsive Image

हु.बहिर्जी स्मारक विद्यालयात मराठवाड्याचे गांधी म्हणून ओळख असलेले डॉ. गंगाप्रसादजी अग्रवाल यांची जयंती साजरी ...

हिंगोली :- बसमत :- आझाद नायक न्युज,सचिन बाहेकर
   दि.7 जानेवारी रोजी वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात मराठवाड्याचे गांधी म्हणून ओळख असलेले, ज्येष्ठ सर्वोदय नेते स्व. डॉक्टर गंगाप्रसादजी अग्रवाल यांची 103 वी जयंती साजरी करून त्यांच्या विचाराला आणि कार्याला अभिवादन करण्यात आले. 
 या कार्यक्रमाचे अध्यक्ष हुतात्मा बहिर्जी स्मारक शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय पंडितराव देशमुख सर हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून बहिर्जी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक तथा मराठवाडा खादी ग्रामोद्योग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय ॲड. रामचंद्र बागल साहेब,तसेच हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.पी.जी.शेळके सर , ॲड.जयप्रकाश अग्रवाल ,उप मुख्याध्यापक श्री.जि.आर. आरकिलवाड सर,पर्यवेक्षिका श्रीमती एस.व्ही.जाधव मॅडम, पर्यवेक्षक श्री.डी.आर.बागल सर, पर्यवेक्षक श्री.के.बी.वायचाळ सर , जेष्ठ शिक्षक एस.एन.गडगिळे सर यांच्या उपस्थिती मध्ये 
डॉ.गंगाप्रसादजी अग्रवाल यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांनी गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
 शाळेतील विद्यार्थ्यांनी गंगाप्रसाद जी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित मनोगते व्यक्त केली. आदरणीय पंडितराव देशमुख सरांनी गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी हे एक गांधीवादी विचारवंत तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सेनानी होते त्यांनी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी आपले जिवन समर्पित केले,अशा शब्दांत त्यांनी गंगाप्रसाद जी अग्रवाल यांचा गौरव केला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी.जी. शेळके सर, आदरणीय रामचंद्र बागल साहेब, एस.एन. गडगिळे सर यांनी गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या जीवनावर आपली मनोगते व्यक्त करुन त्यांना अभिवादन केले. 
 आज विद्यालयात गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या जयंतीनिमित्त खादीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी खादी ग्रामोद्योग समितीचे उपाध्यक्ष आदरणीय रामचंद्र बागल साहेब यांनी खादी हे केवळ कपडे नसुन विचार आहे, खादीचे कपडे वापरण्याचा संकल्प करण्यात आला.त्यांनी खादीचे महत्व सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार श्रीमती एस.बी.सरोदे मॅडम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग आणि शालेय शिस्त विभागाने मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments