Header Ads Widget

Responsive Image

अमळनेर फार्मसी महाविद्यालयात रंगली प्रश्नमंजूषा स्पर्धा; विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

अमळनेर:- आझाद नायक न्युज
                मुकेश भावसार
  खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डि. फार्मसी व प्रा. र. का केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयात प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली त्या दरम्यान प्रा.देवेश भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 केवळ पदवी पुरेशी नाही, तर कौशल्यावर आधारित ज्ञान हवे" – प्रा. देवेश भावसार 
 कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. देवेश भावसार यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील आव्हानांवर आणि फार्मसी क्षेत्रातील संधींवर प्रकाश टाकला. "अशा प्रश्नमंजूषा स्पर्धा केवळ जिंकण्यासाठी नसून, त्या स्वतःचे परीक्षण करण्यासाठी असतात. पुस्तकाच्या चार भिंतींच्या बाहेर जाऊन जेव्हा आपण स्पर्धेत उतरतो, तेव्हाच आपल्याला खऱ्या जगातील स्पर्धेची जाणीव होते."
​विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की "आज औषध क्षेत्रात दररोज नवीन संशोधने होत आहेत. फार्मसीचा विद्यार्थी म्हणून आपल्याला फक्त औषधांची नावे माहिती असून चालणार नाही, तर त्यांचे रेणवीय सूत्र आणि त्यांचे मानवी शरीरावरील परिणाम याची सखोल माहिती असणे आवश्यक आहे."
  सदर कार्यक्रमास प्रा.अनिल बोरसे, प्रा.स्वप्नाली महाजन,प्रा. गीतांजली पाटील, प्रा.प्रगती पाटील,प्रा. हर्षदा पवार प्रा.वैशाली कुलकर्णी व श्री.ज्ञानेश्वर चौधरी, श्री.प्रकाश पाटील उपस्थित होते.

 अशा स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला तुमच्यातील भावी संशोधक आणि तज्ज्ञ पाहायला मिळाले. असे मत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना फार्मसी चे चेअरमन योगेश मुंदडे,प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र सोनवणे यांनी व्यक्त केले व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments