अकोला :- आझाद नायक न्युज 17/12/2025
अकोला जिल्ह्यातील पातुर, बाळापूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, तालुक्यातील एकुण 50 -60 शेतकरी व रहिवासी असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजने अंतर्गत सन 2024 - 25 च्या योजनेमधुन मंजुर झालेल्या विहिरीचे अनुदान अद्याप पावेतो शेतकऱ्यांना मिळालेले नाही.
सदर विहिरी मार्च - एप्रिल 2025 मध्ये खोदून ठेवल्या असुन त्यासाठी मिळणारे अनुदान अजुनही अप्राप्त असल्यामुळे विहिरीचे बांधकाम करण्यात आले नाही. ह्या विहिरी बांधकाम न केल्यामुळे पावसामुळे बुजून गेल्या व खचून सुद्धा गेल्या आहेत. एका शेतकऱ्याचे आतापर्यंत 4 लाख रुपयेखर्च झाले असुन शेतकऱ्यांवर आता आत्महत्या करण्याचीवेळ आली असुन त्याची जबाबदारी हि शासनाची राहील.
शासनाने दिलेल्या सुचने नुसार दिड महिन्याचे आत विहीर खोदण्यास सांगितले होते. परंतु लाभार्थी शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वीच 1 महिन्यात विहिरी खोदून घेतल्या आहेत. परंतु आज 10 महिने होण्यात येत असुन अजुन एकही शेतकऱ्याला अनुदान ( पैसे ) मिळाले नाही. यात कोणी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले तर कोणी दागिने मोडून विहिरी खोदल्या असुन अजुन पर्यंत एकही रुपया निधी शासनाने दिला नसुन शेवटी संतप्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग निवडला असुन जोपर्यंत आम्हाला निधी मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालु राहील.
सदरील उपोषणात महिला, वृद्ध, माणसे उपोषणाला बसत असुन शासनच्या निर्णयाची वाट बघत आहेत.
0 Comments