अकोला महानगरपालिका कार्यक्षेत्रा मध्ये मा.आयुक्त महानगरपालिका अकोला यांचे मार्गदर्शना खाली वैद्यकीय आरोग्य विभाग अंतर्गत दिनांक १८/०६/२५ रोजी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे हरीहर पेठ,जूने शहर येथे विना परवाना वैद्यकीय व्यवसाय करीत असलेल्या कथित डॉक्टर जावेद शेख विरुद्ध कार्यवाही करण्यात आली.
डॉ.आशिष गि-हे वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा,अकोला,डॉ. अनुप चौधरी वैद्यकीय अधिकारी, डॉ.विजय चव्हाण वैद्यकीय अधिकारी,डॉ.प्रभाकर मुदगल वैद्यकीय अधिकारी मनपा,अकोला व जुने शहर पोलिस स्टेशन येथील कर्मचारी श्री अनिल कोरडे यांच्या पथकाद्वारे दि. १८/०६/२५ रोजी दुपारी ३:०० वाजताच्या दरम्यान हरीहर पेठ जूने शहर येथे कथित हॉस्पिटलवर धाड टाकण्यात आली. सदर कार्यवाही दरम्यान कथित डॉक्टर कोणतीही वैद्यकीय व्यवसायाची डिग्री व रुग्णालय नोंदणी नसताना रुग्ण तपासणी व रुग्ण भरती करताना आढळून आले, त्यांना या बाबत विचारणा केली असता त्यांच्या कडे कुठलीही डिग्री ते दाखवू शकले नाहीत. तसेच सदर हॉस्पिटल ला मुंबई नर्सिंग होम अॅक्ट १९४९ अंतर्गत मान्यता बाबत विचारणा केली असता अशी कोणतेही नोंदणी त्यांनी केली नसल्याचे सांगितले.
सदर हॉस्पिटलची तपासणी करते वेळी तेथे ८ बेडस टाकलेले होते. त्यापैकी काही बेडवर रुग्णांना IV Saline लावलेले होते. तेथे बऱ्याच प्रमाणात औषधी साठा आणि वैद्यकीय व्यवसायात उपयोगी मशिन व उपकरणे दिसून आले. सदर सीलबंद औषधीसाठा ए.सी. श्री माणिकराव व श्री गोतमारे औषधी निरीक्षक, औषधी विभाग अकोला यांच्याकडे पुढील कारवाई साठी सुपूर्द करण्यात आला. तरी कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक अहर्ता (डिग्री ) नसतांना अवैध रित्या कायद्या अंतर्गत नोंदणी नसलेल्या ठिकाणी रुग्ण भरती करून कथित डॉक्टर रुग्णाच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून आले सदर कार्यवाही दरम्यान अंकुश धुड, पंकज गायकवाड, कुलदीप बारबदे, किरण शिरसाठ हे सहभागी होते तसेच सदर प्रकरणी अॅड. सॉ शुभांगी ठाकरे (विधी समुपदेशक ) जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, पी.सी.पी. एन.डी.टी विभाग अकोला यांनी विधी विषयक मार्गदर्शन केले.
तरी याबाबत फिर्याद डॉ. आशिष गि-हे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा, अकोला यांचे मार्फत जुने शहर पोलिस स्टेशन येथे देण्यात आली आहे.
0 Comments