Header Ads Widget

Responsive Image

स्मितोदय फाउंडेशन तर्फे १ जूनला महिला साठी मॅरेथॉन व वॉकेथॉन स्पर्धाचे आयोजन....

अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त स्मितोदय फाउंडेशन तर्फे १ जूनला मॅरेथॉन व वॉकेथॉन स्पर्धा
अमळनेर : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित स्मितोदय फाउंडेशन तर्फे मुंदडा फाउंडेशन सहकार्याने महिलांसाठी १ जून रोजी भव्य मॅरेथॉन आणि वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
  महिलांनी सक्षम व्हावे ,शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती साठी त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ३५ वर्षांपर्यंतच्या तरुणींसाठी अडीच किमी धावण्याची स्पर्धा तर ३५ वर्षे वरील महिलांसाठी ५ किमी चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 
१ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून सकाळी ७ वाजता नोंदणी सुरू होईल. 
प्रत्येक स्पर्धेत प्रथम पाच क्रमांका पर्यंतच्या विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र बक्षिस देण्यात येणार आहे. तर प्रत्येक सहभागी महिलेला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  
   या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी व तरुणींनी सहभागी व्हावे असे आवाहन स्मितोदय फाउंडेशनच्या खासदार स्मिता वाघ भैरवी वाघ- पलांडे यांनी केले आहे.
  स्पर्धेसाठी खालील नंबर वर संपर्क साधा
अमेय मुंदडा 8600505545, 
संजय पाटील 9422734106, सुनील वाघ 9579294827, 
माधुरी पाटील 82084 07378, रंजना देशमुख 9422716950,
 प्रा शिला पाटील 9422409959, स्नेहा एकतारे 9423902965, वसुंधरा लांडगे 9689037841, स्वप्ना पाटील 8805583355 यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त महिला,मुलींनी नावे नोंदणी करावी.

Post a Comment

0 Comments