अकोला पूर्व मतदार संघातील बोरगाव मंजू येथे मागील काळात मंजूर केलेल्या ग्रामीण रुग्णालय बांधकाम कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना यावेळी आ.रणधीर सावरकर यांनी दिल्या मागील काही दिवसांपासून मुंबई येथे असून सुद्धा जिल्ह्यातील विविध विषयांना घेऊन कायम follow up घेणारे आ.रणधीर भाऊ सावरकर यांनी आज मुंबईहून थेट बोरगाव मंजू गाठत तेथील ग्रामीण रुग्णालय बांधकामाची व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण द्वारा सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली यावेळी नागरिकांच्या व अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
मतदारसंघाच्या सर्वस्पर्शी विकासा साठी कायम कार्यरत असणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्याचीच एक प्रचिती आज पहावयास मिळाली जी थेट मुंबई हुन बोरगाव ला जाऊन विकास कामांची पाहणी केली.
यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बोरगाव मंजू येथील नागरिक सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments