Header Ads Widget

Responsive Image

30 ते 40 व्यक्ती पत्र्याचा ( टिन ) शेड खाली दबून जखमी.. एकाचा मृत्यू...



ब्रेकिंग न्युज :-आझाद नायक न्युज प्रतिनिधी गुलाम मोहसीन

आमदार सावरकर, बळीराम सिरस्कार यांनीं दिली घटनास्थळी भेट 

बाळापुर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात मोठी घटना टिन शेडवर निंबाचे झाडं पडून अंदाजे ३० ते ४० व्यक्ती टिन शेड खाली दबले!.......एकाचा मृत्यू.........

मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता!

बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर

पारस गावात मोठे नुकसान, बाबूजी महाराज मंदिरातील टिन शेडवर निंबाचे झाडं पडून अंदाजे ३० ते ४० व्यक्ती टिन शेड खाली दबले असून १०,१२ जणांना बाहेर काढण्यात यश तर एकाचा मृत्यू आणखी जखमी व मृतक असल्याची शक्यता

बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरु असताना आज 9 एप्रिल रोजी सायंकाळची घटना

जखमीना वाचण्यासाठी घटनास्थळी उपविभागीय अधिकारी, बाळापूर पोलीस, तहसीलदार, पारस औष्णिक विद्युत केंद्रातील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल अनेक नेते प्रकाश तायडे घटनास्थळी दाखल असून जखमींना रुग्णालयात पाठवत आहेत.

एका तासापासून गावात लाईन बंद असल्यामुळे जखमींना टिन शेड खालून काढण्यासाठी गावकऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरु असून यामध्ये तीन सेट खाली दबून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये आणखी मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बाळापूर पारस व शेळद फाटा पारस रोडवर सुद्धा झाडं कोसळल्याने ऍम्ब्युलन्स पोहचण्यात अडचणी येत आहेत.
पारस घटनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आरोग्य यंत्रणा पोलिस यंत्रणा सजग मदत कार्याला गती द्या आमदार रणधीर सावरकर यांना घटनास्थळी पाठवून ताबडतोब माहिती व मदत कार्याची माहिती घेण्यास सांगितले जिल्हा प्रशासनाला आदेश पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची अयोध्ये वरून आदेश मानवता कार्याला गती द्या महसूल पोलीस यंत्रणा निर्देश दिले आहेत.
तसेच आमदार रणधीर सावरकर यांनीं दवाखान्यात जखमीची विचारपूस करून धिर दिला

Post a Comment

0 Comments