Header Ads Widget

Responsive Image

शिक्षकाचे विद्यार्थ्यासोबत शाळेत अशोभनीय कृत्य विचित्र प्रकारे कापले केस !

शिक्षकाचे विद्यार्थ्यासोबत शाळेत अशोभनीय कृत्य विचित्र प्रकारे कापले केस !

अकोला - मुकेश भावसार

जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील पातूर मार्गावर असलेल्या अली पब्लिक सीबीएससी पॅटर्न स्कूलमधील एका शिक्षकाने विद्यार्थ्या सोबत अशोभनीय कृत्य केले. या शिक्षकाने विद्यार्थ्याचे थेट कैचीने केस कापल्याची घटना घडली आहे.
मुलाच्या आईं ने दिलेल्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अकोला येथील पातूर मार्गावर अली पब्लिक स्कूल आहे.

या स्कूलमध्ये एक विद्यार्थी शिक्षण घेत असून, विद्यार्थी हा दुसऱ्या विद्यार्थ्यां सोबत मस्ती करत असल्या मुळे शिक्षा म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्या चे केस बळजबरीने विचित्र प्रकारे कापले कापल्याप्रकरणी सदर प्रकरण विद्यार्थ्याच्या नातेवाइकांनी गांभीर्याने घेतले आहे. आधी शाळेमध्ये जाऊन शिक्षकाला विचारणा करण्यात आली. परंतु शिक्षक हजर नव्हते व तेथील कर्मचाऱ्यांना यांना उडवा उडवी चे उत्तर दिले त्यानंतर समाधान न झाल्या ने विद्यार्थ्याच्या नातेवाइकानी जुने शहर पोलिस स्टेशन गाठून झालेल्या प्रकाराची पोलिसांत तक्रार दिली.
अशी माहिती मुलाच्या नातेवाईकाने आम्हाला दिली प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जुने शहर पोलिसांनी शिक्षक जावेद यांच्या विरूध्द जेजे अॅक्ट कलम ७५ सहकलम ३५५ आयपीसी अॅक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती जुने शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी दिली.

Post a Comment

1 Comments

  1. अकोला के कुछ दलाल पत्रकार ये न्यूज नही लगाई पत्रकर ये सभी के लिए समान होना चाईए

    ReplyDelete