Header Ads Widget

Responsive Image

प्रशासन सुस्त अमळनेर मधील नागरिक त्रस्त...अनेक समस्यांनी नागरिक परेशान

अमळनेर :- विकी भावसार

भावसार समाजाचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे पदाधिकारी श्री. चंद्रशेखर भावसार मांजामुळे जखमी 

मोटारसायकलने जाणाऱ्या भावसार समाजा चे माजी अध्यक्ष व LIC एजंट चंद्रशेखर भावसार यांचा मांजाने ओठ कापला गेला.ही घटना रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अमळनेर येथील धुळे रोड भागात घडली.

चंद्रशेखर हिरालाल भावसार (५४,रा. पानखिडकी,अमळनेर) असे या जखमी इसमाचे नाव आहे. ते मोटारसायकलने बाजार समिती कडे निघाले होते. धुळे रोडवर कापलेल्या पतंगा च्या मागे बालकांचा घोळका रस्त्याने पळत होता त्याचवेळी या पतंगाचा मांजा त्यांच्या चष्म्यात अडकला तिथून तो सरळ ओठावर आला काही कळण्याच्या आत ओठच कापला गेला. त्यांच्या उजव्या पायालाही जखम झाली आहे. चंद्रशेखर भावसार यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Post a Comment

0 Comments