मी नाही त्यातली कडी लावा आतली... पुरवठा विभागात भोगळं कारभार....
शिवभोजन थाळी व रेशन दुकान वाटपात गैरव्यवहार... नविन उमेदवारांना डावलले....कुठलीही निविदा न काढता डायरेक्ट दिला कॉन्ट्रॅक्ट....
या अगोदर देखील बी. यु. काळे यांनी रेशन दुकानात एका माजी आमदार व मंत्र्याच्या फोन ने भुज बळ मजबुत करून घेतले रेशन दुकानासाठी 75000 रु.
शासन निर्णय काढण्याच्या या सपाट्यात अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शासनादेश जारी करून राज्यभरात नवीन शिवभोजन केंद्रांना मंजुरी दिली व काही कार्यरत शिवभोजन केंद्रांच्या थाळीसंख्येतही वाढ केली. सदर शासन निर्णयानुसार जिल्ह्यात सुद्धा चार शिवभोजन केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण शिवभोजन केंद्रांची संख्या ४२ झाली आहे.
जिल्ह्यात २६ जानेवारी २०२० पासून शिवभोजन थाळीची सुरूवात झाली. सुरुवातीला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर व सर्वोपचार रूग्णालय या दोन ठिकाणी २०० थाळी प्रतिदिन क्षमतेचे शिवभोजन केंद्र कार्यान्वित झाले, परंतु नंतर कोविड-१९ च्या संकटामुळे शासनाने शिवभोजन थाळीचा वाढीव इष्टांक मंजूर केला. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात १ एप्रिल २०२० पासून नवीन शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. या सर्व केंद्रांवरून सुरुवातीच्या काळात १० रुपये प्रति थाळी याप्रमाणे दररोज १५०० थाळींचे वाटप करण्यात येत होते.
त्यानंतर थाळ्यांची संख्या वाढवून तीन हजार करण्यात आली. परंतु नंतरच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शिवभोजन थाळीची किंमत ५ रुपये प्रति थाळीने करण्यात आली होती. दरम्यान शासनाने अधिकाधिक नागरिकांना शिवभोजनचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यात एकूण ३८ केंद्र मंजूर केले होते. याव्यतिरिक्त आणखी केंद्र चालकांनी मंजुरीसाठी पुरवठा विभागात प्रस्ताव सादर केले होते. परंतु त्याला मंजुरी देण्यात आली नव्हती. दरम्यान शासनाने जिल्ह्यात आणखी चार शिवभोजन केंद्र मंजूर केले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांची संख्या ४२ झाली आहे.
एका केंद्राच्या थाळी संख्येत वाढ
संत गाडगे महाराज महिला बचत गट अकोला मार्फत जिल्हा न्यायालय रेल्वे स्टेशन जवळ संचालित शिवभोजन केंद्राची थाळी संख्या सुद्धा शासनाने शासन निर्णयाद्वारे वाढवली आहे. त्यानुसार संबंधित केंद्राला ७५ वाढीव थाळी संख्या मंजूर करण्यात आली आहे.
नवीन मंजुरी प्राप्त शिवभोजन केंद्र
केंद्र थाळी संख्या
कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट ७५
आगीखेड तालुका पातूर ७५
समर्थनगर पातूर १००
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला १००
जिल्ह्यात नव्याने चार शिवभोजन केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. जुन्या ३८ व नव्या चार शिवभोजन केंद्रांमुळे आता जिल्ह्यातील एकूण शिवभोजन केंद्रांची संख्या ४२ झाली आहे. याव्यतिरिक्त एक केंद्रातील थाळी संख्या सुद्धा वाढवण्यात आली आहे.
या अगोदर शिवभोजन थाळी वाढवण्याचा प्रस्ताव कोणाचा आला व कोणाला सर्व्या बाबतीत ओले ( थंडे ) करून हा प्रस्ताव देण्यात आला याची देखील सखोल चौकशी व्हावी असे पीडिताणं कडुन सांगण्यात आले आहेत. आम्ही एव्हडा खर्च केला पण पण आम्हाला डावलण्यात आले व आमचे नाव गुप्त ठेवण्यात यावे अशी खंत या अटीवर पीडितांनी आझाद नायक न्युज जवळ बोलुन दाखवली ...
तुम मुझे (पैसा ) माल दो मै तुम्हे हरकाम ( रेशन दुकान, शिवभोजन ) ठेका दूंगा...हा पवित्रा इथे राबविण्यात येत आहे.
-
0 Comments