Header Ads Widget

Responsive Image

रोटरी समाजकार्य करण्याचे प्रभावी माध्यम - अनुप धोत्रे


रोटरी समाजकार्य करण्याचे प्रभावी माध्यम - अनुप धोत्रे

रोटरी क्लब ऑफ अकोला ऍग्रोसिटीचा पदग्रहण सोहळा दिमाखात  संपन्न

रोटरी क्लब अकोला ऍग्रोसिटीचा पदग्रहण सोहळा MIDC च्या असोसिएशन हॉल ,अप्पू चौक येथे नुकताच पार पडला.

याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष एडवोकेट देवाशिष काकड, सचिव नीरज देशमुख व बोर्ड ची निवड करण्यात आली व पदभार देण्यात आला आणि नवीन सदस्यांना नियुक्ती पत्र देऊन हा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेतृत्व ,युवा उद्योजक अनुपभाऊ धोत्रे व रोटरीचे माजी गव्हर्नर श्री महेशजी मोकळकर हे होते. 
याप्रसंगी व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी श्रीनिवास लेले, ऍग्रो सिटी क्लबचे माजी अध्यक्ष एडवोकेट राजेश आकोटकर ,माजी सचिव सोमेश्वर रत्नपारखी उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना श्री अनुप धोत्रे यांनी रोटरी हे समाजसेवा करण्याचे एक प्रभावी व सक्षम माध्यम असून रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळातील वंचित शोषित घटकापर्यंत पोहोचण्याचा व त्यांची सेवा करण्याचा मार्ग प्रशस्त होतो रोटरी संस्थेची नावलौकिक आणि त्यासोबत जोडलेले सामाजिक कार्य करणारे विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या त्यांच्या अनुभवाचा समाजाला नक्कीच उपयोग होतो असे प्रतिपादन केले व कॉस्मेटिक प्लांट्स संदर्भात जनजागृती करून त्या माध्यमातून अनेक महिलांना उद्योग देता येईल असे सुचवले व यासंदर्भात ऍग्रोसिटी क्लब ने काम करावे अशी आशा सुद्धा व्यक्त केली व नवनिर्वाचित अध्यक्ष एडवोकेट देवाशीष काकड व सचिव नीरज देशमुख यांना व पूर्ण बोर्ड आणि नवनियुक्त सदस्यांना शुभेच्छा दिल्या व ऍग्रोसिटी क्लबला समाजसेवेच्या व्रतात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.  

माजी गव्हर्नर महेशजी मोकळकर यांनी रोटरीच्या कार्यावर प्रकाश टाकला व रोटरी ही अंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठी सामाजिक सेवा करणारी संस्था असून तिची पाळंमुळं ही सबंध भारतात घट्टपणे रुजलेली आहे व रोटरीच्या माध्यमातून अनेक सेवा प्रकल्प आज सुरू आहेत असे प्रतिपादन केले व नवनिर्वाचित अध्यक्ष,सचिव, कार्यकारिणी व नवनिर्वाचित सदस्यांना अभिनंदन देत त्यांनी रोटरीचा आदर्श पुढे न्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कु. अक्षरा पाटील व कु. तनया भोकरे यांनी गणेश वंदना म्हणून सर्वांना मंत्रमुग्ध केले

डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी श्रीनिवास लेले यांनी रोटरीचे गव्हर्नर डॉक्टर आनंद झुनझुन वाला यांचा लिखित संदेश उपस्थितां समोर वाचला आणि सर्व नवनिर्वाचित टीमला भरभरून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी डॉ जुगल चिरानिया ,अतुल चौधरी, एडवोकेट आनंद गोदे ज्ञानसागर भोकरे ,गुणवंत देशपांडे,सुनील घोडके ,नारायण कळमकर, संतोष पाटील, शशांक जोशी, राजेश राऊत, नवीन धोटकर, आशिष धाडे ,अमित कोल्हटकर, संगीता चौधरी, अर्चना पाटील, अश्विनी भोकरे, संपदा जोशी, दिपाली रत्नपारखी, सुनीता देशपांडे, प्रेरणा घोडके, संध्या अकोटकर व अकोला शहरातील इतर क्लबचे सन्माननीय अध्यक्ष सचिव व पदाधिकारी उपस्थित होते 

नवनियुक्त सदस्यांमध्ये अभिजीत कडू अभिजीत आखरे आनंद थोटांगे, आशिष वानखडे,सागर जोशी, विधीश साकरकार, अमोल बोचे, डॉ पार्थ गवात्रे, गणेश सारसे, श्रीकांत हांडे, जितेंद्र देशमुख, कौशल वानखडे, कृष्णा तिडके, राहुल केकान ,डॉ सौरभ बोराखडे, वैभव मेहरे, विवेक झापर्डे ,वसंत खराडे, मुक्ता धाडे, राज ईश्वरकर, दीपक वानखडे, दिलीप देशमुख, अनंता ठाकरे, मयूर देशमुख, तुषार मुर्हेकर, श्रीकांत देशमुख, प्रसाद देशमुख, यांची नवनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती झाली 

यावेळी माधव मानकर, सागर शेगोकार, प्रशांत अवचार,अशोक देशमुख, प्रतिभा देशमुख, कल्याणी देशमुख, ऐश्वर्या देशमुख हे उपस्थित होते . या कार्यक्रमाला श्री केशव हेडा, शांताराम अवचार यांचे विशेष सहकार्य लाभले 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल चौधरी व एडवोकेट आनंद गोदे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष गुणवंत देशपांडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments