अकोला :- आझाद नायक न्युज
अकोल्यात मा. नितीन गडकरीजी यांनी नुकतेच उड्डाण पुलांचे उदघाटन केले रस्त्यांचे कामही झाले. परंतु हे काम कसे व कश्या पद्धतीने केले आहेत याचे सर्वश्रुत उदाहरण म्हणजे हेड पोस्ट ऑफिस समोरील कोपऱ्यावर व मा. जिल्हाधिकारी यांच्या बंगल्या शेजारील रोडवर नाली चे काम करण्यात आले.
नालीवर निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आल्याने नालीवरील स्लॅब हा पूर्णतः तुटला असुन या रोडवर महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी तसेच दवाखान्यात जाणाऱ्या पेशंट व येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांची खुप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते अश्या वर्दळीच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी या नालीवरील स्लॅबचे काम लवकरात लवकर करावे व होणाऱ्या मोठ्या अपघातापासून नागरिकांना वाचवावे असा सुर जनतेमधून उमटत आहे.
0 Comments